अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

अबकारी कर घोटाळाप्रकरणी तुरुंगात असलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची न्यायालयीन कोठडी राऊस अव्हेन्यू कोर्टाने 8 ऑगस्टपर्यंत वाढवली आहे. केजरीवाल यांना त्यांच्या वकिलांशी तुरुंगात दर आठवडय़ाला दोन अतिरिक्त व्हर्च्युअल बैठका घेण्याची परवानगी हायकोर्टाने दिली आहे. केजरीवाल यांच्या सीबीआय अटकेला आव्हान देणाऱया याचिकेवर आणि अंतरिम जामीन अर्जावर 29 जुलै रोजी सुनावणी होणार आहे. मनीष सिसोदिया, भारत राष्ट्र समितीच्या नेत्या के. कविता आणि अन्य आरोपींची न्यायालयीन कोठडीही कोर्टाने 31 जुलैपर्यंत वाढवली.