दिल्ली विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापत आहे. त्यातच आता आपचे समन्वयक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. भाजपला दिल्लीतील जनतेचे मतं विकत घ्यायची आहेत, त्यासाठी पैसे वाटण्यापासून विविध आमिषे दाखवत आश्वासनांची खैरात ते करत आहेत. मात्र, दिल्लीतील जनता विकली जात नाही, हे बेईमानांना दाखवून देण्याची वेळ आली आहे, असे केजरीवाल यांनी सांगत भाजपवर निशाणा साधला आहे.
दिल्लीतील विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप उघडपणे पैसे वाटत आहे. यामुळे लोकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. अरविंद केजरीवाल म्हणाले, भाजपवाले म्हणत आहेत की, आम्ही मतं खरेदी करू. मी लोकांना आवाहन करतो की, जे काही मिळेल ते घ्या, भांडून भांडून घ्या. त्यांच्या ऑफिसमध्ये जा आणि ते घ्या, पण तुमचं मत विकलं जाऊ देऊ नका. आपलं मत मौल्यवान आहे, हिऱ्यापेक्षाही मौल्यवान आहे. मी असं म्हणत नाही की, तुम्ही आपला मतदान करा, पण जे पैसे वाटत आहेत त्यांना मत देऊ नका. हे गद्दार आहेत. त्यांना देश विकत घ्यायचा आहे, ते अहंकारी आहेत. दिल्लीतील लोकांना विकत घेता येत नाही हे सिद्ध करा. यावेळी या गुंडांना सांगा की दिल्लीचे लोक विकले जात नाहीत, असे आवाहनही केजरीवाल यांनी जनतेला केले.
गाली गलौज पार्टी के लोग दिल्ली की जनता को ख़रीदना चाहते हैं।
वक्त आ गया है इन बेईमानों को ये बताने का कि दिल्ली की जनता बिकाऊ नहीं है। इस देश का लोकतंत्र बिकाऊ नहीं है।
दिल्लीवालों से मेरी खास अपील – pic.twitter.com/HzpQZpgWFp
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) January 14, 2025
भाजपने जनतेला वाटण्यासाठी प्रत्येकी 10,000 रुपये पाठवले, पण त्यांच्या नेत्यांना वाटतं की, ते जिंकणार नाहीत, म्हणून ते पैसे कमावताहेत. त्यांच्या नेत्यांनी प्रत्येकी 9,000 रुपये स्वत:कडे ठेवले आणि 1000 रुपये वाटले. तेही सर्वांना दिले गेले नाही. लोकांना याबद्दल आता माहिती होत असल्याने त्यांच्यात संतापाचं वातावरण आहे. त्यामुळे जनतेची मतं विकत घेणाऱ्यांना मतदान करू नका, असे आवाहन केजरीवाल यांनी जनतेला केले आहे.