बर्फावर चालणं महागात पडलं

सध्या देशातील विविध भागांत बर्फवृष्टी होत आहे. ही नयनरम्य दृश्ये दरवर्षी पर्यटकांना मोठय़ा संख्येने आकर्षित करत असतात. अरुणाचल प्रदेशमधील तवांग येथे गोठलेल्या तलावावर काही पर्यटक चालत असताना अचानक बर्फ तुटल्यामुळे ते पाण्यात पडले. मग उपस्थितांनी तत्काळ धाव घेत त्यांना सुखरूप बाहेर काढले. प्रशासनाने पर्यटकांना त्यांच्या जिवाला धोका असेल अशा ठिकाणीन जाण्याचा सल्ला दिला आहे. तरीदेखील अतिउत्साही पर्यटक गोठलेल्या पाण्यावर फिरताना दिसतात.