>> बालेन्दु शर्मा दाधिच
मानव आपल्या इंद्रियांद्वारे आणि मेंदूद्वारे माहितीवर प्रक्रिया करण्याचे काम पार पाडतो. मशीन पाहू शकत नसले तरीही ते त्याच्या डेटासेट आणि प्रशिक्षणाच्या आधारे बरेच काही ओळखते. परंतु याचा अर्थ असा नाही की, त्यांना त्यांचा अर्थ समजतो. यंत्राला बुद्धिमत्ता नसते, पण तरीही त्याच्यात बुद्धिमत्ता असल्यासारखे ते वागू शकते. कारण आपण असे स्वरूप निर्माण करू शकणारे कृत्रिम साधन तयार केले आहे. याचे नाव आहे कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय.
बुद्धिमत्ता म्हणजे काय? मी म्हणेन, माहिती समजून घेण्याची, विचार करण्याची, तिचे विश्लेषण करण्याची, वाद घालण्याची, निष्कर्ष काढण्याची आणि निर्णय घेण्याची क्षमता. मानवी मेंदू हे काम सहज करतो, तर इतर प्राण्यांचा मेंदू यापैकी काही कामे करण्यास सक्षम असतो, काही कामे तो करू शकत नाही. पण ते सर्व जिवंत आहेत. पण आज आपण कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात प्रवेश केला आहे जो संगणक, सर्व्हर, प्रोसेसर, डेटासेट इत्यादींद्वारे कार्य करतो. या बुद्धिमत्तेचे नमुनेही आपण पाहत आहोत,
कृत्रिम बुद्धिमत्ता ही एक वास्तविकता आहे. कारण बुद्धिमत्तेचा अर्थ मानव आणि मशीनसाठी भिन्न आहे. समान परिणाम देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रक्रिया भिन्न असू शकतात. डेटाची प्रक्रिया वेगवेगळ्या प्रकारे होऊ शकते. 70 ला 28 ने गुणण्यासाठी कोणी पेन आणि कागद वापरू शकतो, तर कोणी कॅल्युलेटर वापरू शकतो. काही जण शोध इंजिनद्वारे परिणाम मिळवू शकतात, तर काही मायक्रोसॉफ्ट एसेलची मदत घेऊ शकतात. तेच काम करण्यासाठी वैदिक गणिताचा वापरही करता येतो आणि अबॅकसचाही वापर करता येतो. ही सर्व माध्यमे आजमावून पाहिल्यानंतर निकाल सारखाच येईल, पण सर्व प्रक्रिया वेगळी होती. त्याचप्रमाणे जेव्हा मनुष्य काही ‘ऐकतो’ तेव्हा तो वेगळ्या प्रक्रियेचा अवलंब करतो. कानातून मिळालेल्या माहितीवर मेंदूद्वारे त्याच्या आकलनाद्वारे किंवा जाणिवेद्वारे प्रक्रिया केली जाते. तशाच प्रकारे आर्टिफिशियल इंटेलिजन्सला भाषणाचे मजकुरात रूपांतरित करण्यासाठी ऑडिओ दिला जातो, तेव्हा ते आधी मिळालेले प्रशिक्षण वापरून हा ऑडिओ ओळखण्याचा प्रयत्न करते, त्याच्या डेटासेटमध्ये लाखो आणि अब्जावधी ऑडिओ असतात. तसेच असंख्य शब्दही असतात. हा डेटा सेट जितका मोठा असेल तितके मजकूर परिणामांचे भाषण अधिक अचूक असेल.
प्रत्यक्षात मशीनमध्ये बुद्धिमत्ता असती तर डेटामध्ये प्रवेश नसताना किंवा डेटा फीड केल्याशिवाय आणि संगणक बंद केल्यानंतरही ते सक्षम ठरले असते. निर्जीव वस्तूंमध्ये बुद्धिमत्ता असू शकत नाही, त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्ता ही एक आभासी गोष्ट आहे जी इतर अनेक पैलू आणि माध्यमांवर अवलंबून असते. एआयसंदर्भातील चर्चा करताना ही मूलभूत माहिती कदापि विसरता कामा नये.
आज आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर प्रत्येक क्षेत्रात होत आहे. जीव वाचवणाऱ्या औषधी उद्योगापासून ते जीवन सुखकर करणाऱ्या उपभोग्य वस्तूंपर्यंत, युद्धसामग्रीपासून ते अंतराळ क्षेत्रापर्यंत प्रत्येक क्षेत्रात काही प्रमाणात त्याचा वापर होत आहे. प्रेसिडेन्सी रिसर्च या कंपनीच्या मते, कृत्रिम बुद्धिमत्तेची जागतिक बाजारपेठ 2030 पर्यंत 1,597.1 अब्ज डॉलर्स इतकी वाढणार आहे. सध्या त्याची सर्वात मोठी बाजारपेठ उत्तर अमेरिका आहे, जिथे इंटेल
कॉर्पोरेशन, आयबीएम, मायक्रोसॉफ्ट, अॅपल, अॅमेझॉन, एनव्हीडिया कॉर्पोरेशन, एच-20 एआयसारख्या जगप्रसिद्ध कंपन्या आहेत. भारताचा विचार केला तर इथेही अनेक क्षेत्रांत आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर सुरू झाला आहे. उद्याच्या जगात कोणता देश कुठे आणि कोणत्या स्थितीत असेल हे त्याच्या आकारावर नाही तर तंत्रज्ञानाच्या खास करून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात तो कुठे आहे यावर अवलंबून आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या बाबतीत दोन सर्वात महत्त्वाच्या गोष्टी आहेत, सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर. त्यामुळे या क्षेत्राच्या गरजेनुसार सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर विकसित करण्याचे काम अतिशय वेगात होणे स्वाभाविक आहे. 2020 मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स सॉफ्टवेअरचा व्यवसाय 2.8 बिलियन डॉलर्स होता आणि 2030 पर्यंत तो 10 बिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. साहजिकच प्रथम या भागातील पायाभूत सुविधा काही प्रमाणात विकसित होतील आणि नंतर त्याच्याशी संबंधित सेवा क्षेत्र वाढेल.
जनरेटिव्ह एआय मोठ्या भाषेच्या मॉडेल्सच्या आधारे कार्य करते. हे मॉडेल खूप मोठ्या प्रमाणात डेटामध्ये प्रवेश करून त्यांची क्षमता शिकतात आणि वाढवतात. पूर्वी लोकांची मोडकीतोडकी भाषा, अनेक बोलीभाषा, हिंदी आणि इंग्लिश एकत्र करून तयार केलेले अपशब्द समजणे कठीण होते, पण एआयमुळे आता ते समजणे सोपे आणि गतिमान झाले आहे. यामुळे एआयच्या वापराने नोकरशाही आणि प्रशासनातही कायापालट होणार आहे. प्रशासन आला केवळ नागरिकांच्या समस्या चांगल्या प्रकारे समजूनच घेऊ शकते असे नाही, तर प्रत्येक व्यक्तीला समर्पक उत्तरेही देऊ शकते. काम कुठे कार्यक्षम आहे, कुठे संथ आहे, कुठे अडले आहे याचे विश्लेषण करणे एआयमुळे सहजशक्य आहे. इतकेच नव्हे तर कामात नेमके कोण अडथळा निर्माण करत आहे याचाही शोध एआयमुळे लागू शकतो.
(लेखक प्रख्यात तंत्रज्ञान तज्ज्ञ आहेत.)