वेब न्यूज –  अमेरिका आणि एलियन्स

एलियन्सच्या संदर्भात सर्वात जास्त चर्चेत असलेला देश म्हणजे अमेरिका. नुकतेच अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी या संदर्भात भाष्य केले आहे. आपण निवडणूक जिंकल्यास एलियन्सच्या संदर्भात अमेरिकेकडे असलेली सर्व गुप्त माहिती जाहीर करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यांच्या या घोषणेनंतर एलियन्स हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अमेरिकेच्या वायुसेनेकडे आणि सैन्याकडे एलियन्सचे फोटो, तसेच व्हिडीओ असल्याची खात्री जगभरातील अनेक लोकांनी व्यक्त केली आहे. अमेरिकेच्या वायुसेनेतील अनेक पायलटना यापूर्वी अनेकदा विचित्र अनुभव आल्याचे, तसेच चित्रविचित्र गोष्टी दिसल्याचीदेखील चर्चा पुन्हा रंगली आहे. या चर्चेत अमेरिकेत पूर्वी घडलेल्या काही प्रमुख घटना पुन्हा एकदा सोशल मीडियावर फिरवल्या जात आहेत. 1947 साली अमेरिकेतील न्यू मेक्सिको इथे असलेल्या रोसवेल गावात एलियन शिप कोसळल्याचा दावा त्या काळी करण्यात आला होता. ही रहस्यमयी वस्तू म्हणजे UFO चे अवशेष असल्याचा दावा स्थानिकांनी केला. पुढे 1970 साली या घटनेच्या संदर्भात अनेक दावे करण्यात आले. एका दाव्यानुसार ही कोसळलेली वस्तू म्हणजे उडती तबकडी होती आणि अमेरिकेच्या सैन्याला त्यात एका एलियनचे शवदेखील सापडले होते. अमेरिकेच्या सैन्यानेदेखील त्याचा स्वीकार केला होता, मात्र पुढे ही कोसळलेली वस्तू म्हणजे हवामान अभ्यासासाठी सोडण्यात आलेल्या फुग्याचा हिस्सा असल्याचा दावा सैन्याने केला. त्यामुळे सैन्याने एलियनचे शव लपवून ठेवले असल्याचा आरोप जोर पकडू लागला. अमेरिकेच्या न्यू हॅम्पशायरमध्ये राहणाऱ्या एका दांपत्याने एलियन्सने त्यांचे अपहरण केले होते असा दावा केला होता. त्यांच्या सांगण्यानुसार घरी परतत असताना अचानक त्यांच्या गाडीसमोर एक तीव्र उजेड पडला आणि त्यांची शुद्ध गेली. अपहरण करून त्यांना एका आधुनिक अशा UFO मध्ये नेण्यात आले आणि तिथे एलियन्सनी त्यांच्या शरीराचा अभ्यासदेखील केला. जगभरात त्यांच्या या दाव्याची खूप चर्चा झाली होती.

स्पायडरमॅन