मंथन- आहोत नदीपूजक तरीही…

>> योगेश मिश्र

ज्या देशात, समाजात नदी, पर्वतरांगा या वंदनीय, पूजनीय नाहीत तेथे मात्र त्यांच्या उगमस्थानाचे, काठाचे पावित्र्य जपण्यात आले असून स्वच्छता, नितळ सौंदर्यही अबाधित राखण्यात आले आहे. आम्ही मात्र नद्यांचे-पर्वतांचे  मारेकरी आहोत. नर्मदा असो किंवा कृष्णा, गंगा किंवा यमुना, या नद्या श्रद्धास्थानी आहेत. दुर्दैव म्हणजे आपणही तेवढय़ाच प्रमाणात तेथे श्रद्धेने कचरा टाकत राहू. अर्थात हा मुद्दा केवळ नदी, पर्वत, जंगलापुरताच मर्यादित नाही, तर आपला दृष्टिकोन आणि वर्तनाशी संबंधित आहे.

आपण सर्वजण निसर्गाला ईश्वर मानतो, त्याची पूजा करतो. नदी, पर्वतरांगा, सूर्य, चंद्र या सर्व गोष्टी आपल्यासाठी पूजनीय आणि वंदनीय आहेत. जगासाठी आपण (हिंदुस्थानी) असामान्य आहोत.  जगात अन्यत्र कोठेही अशा प्रकारची श्रद्धा पाहावयास मिळत नाही. नद्या तर आपल्यासाठी जीव की प्राण! गंगा नदीला तर आई मानतो. नर्मदेला महादेवाची कन्या मानले आहे. हिंदुस्थानी संस्कृतीचे पालनपोषणदेखील नदीकाठावर अधिक दिसून येते. देशातील सर्वच नद्यांची नियमितपणे पूजाअर्चा होताना आणि त्याविषयी श्रद्धा बाळगत असताना मध्य प्रदेशातील नर्मदेबाबत एक परिणामकारक निर्णय घेतला गेला. नर्मदा नदीचे उगमस्थान मध्य प्रदेशात असल्याने सरकारने घेतलेला निर्णय महत्त्वाचा. या सरकारने  ज्या ठिकाणाहून नर्मदा वाहते तेथील काठावरचे शहर, गावांत मद्यपान आणि मांसाहार यांसारख्या गोष्टींवर निर्बंध लावण्याचे ठरविले. यामागचा उद्देश नर्मदा नदीचे पावित्र्य जपणे. यानुसार नदीचे पावित्र्य जपण्यासाठी नदीकाठावर मांसाहार अणि मद्यपान करता येणार नाही. मध्य प्रदेशच्या अमरकंटक येथे उगम पावणारी आणि खुंबाटच्या खाडीत मिसळणारी नर्मदा नदी 1312 किलोमीटरचा प्रवास करते आणि मध्य प्रदेशातील तिचा प्रवास 1079 किलोमीटर  आहे. राज्यातील 21 जिल्हे, 68 तहसील आणि 1126 घाट नर्मदा नदीने व्यापलेले आहेत. मध्य प्रदेश सरकारच्या निर्णयाचा दूरगामी परिणाम या सर्व भागांवर होणार हे निश्चित.

नर्मदा नदीची काळजी यापूर्वी एवढय़ा प्रमाणात घेतल्याचे ऐकीवात नाही. अनंत काळापासून वाहत आलेल्या नर्मदा नदीला आता मद्य आणि मांसाहाराच्या सावलीतून वाचविण्यासाठी पुढाकार घेतला गेला असून ती मोठी बाब मानावी लागेल. आतापर्यंत केवळ गंगा नदीबाबतच बोलले जायचे. तिची स्वच्छता, तिचे पावित्र्य जपण्याचाच मुद्दा मांडला जायचा आणि आजही दिसतो. अर्थात गंगा नदी सुमारे 40 कोटी लोकांचे पालनपोषण करते. आम्ही तर गंगा नदीला अनेक दशकांपासून म्हणजे 1980 पासून स्वच्छ आणि निर्मळ करण्याच्या मागे लागलो आहोत. गंगा नदीच्या काठावर वसलेल्या 97 शहरांतील मद्यपान, मांसाहाराबाबत काही बोलू शकत नाही, पण या शहरांतून 2953 दशलक्ष मीटर सांडपाणी बाहेर पडते आणि ते गंगा नदीत मिसळले जाते. हे प्रकार थांबविण्यासाठी 1983 मध्ये ‘मिशन लीन गंगा’ नावाची मोहीम सुरू केली आणि सर्वांनी पोटचा मारा करून कोटय़वधीचा पैसा गंगा नदीसाठी खर्च केला. त्याच्या खर्चाचा अंदाज लावायचा असेल तर 2014 ते आतापर्यंत दहा वर्षांत ‘नमामि गंगे’ प्रकल्पापोटी 40 हजार कोटी रुपये खर्च केले गेले. 1985 ते 2014 पर्यंतचा हिशेब तुम्हीच करा. या प्रकल्पानुसार गंगा नदीच्या काठावर बांधकाम, प्रातर्विधी, कपडे धुणे, प्लॅस्टिक कचरा आदी सर्व गोष्टींवर बंदी घालण्यात आली आहे. एव काळजी घेतली जात असतानाही तसेच गंगा आरती, गंगास्नान, नदीचे पूजन एवय़ा गोष्टी केल्या जात असतानाही गंगा ही सर्वात दूषित नदींपैकी एक कशी? गंगा नदीच का, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने 2018 रोजी जारी केलेल्या अहवालानुसार हिंदुस्थानात 351 नद्या दूषित आहेत. नद्या पूजनीय म्हणतो, परंतु पूजा आटोपल्यानंतर कॅरी बॅगमध्ये पूजेचे राहिलेले साहित्य गोळा करून ते नदीत टाकतो आणि हात जोडून निघून जातो.

एक विचित्र गोष्ट म्हणजे ज्या देशात, समाजात नदी, पर्वतरांगा या वंदनीय, पूजनीय नाहीत तेथे मात्र त्यांच्या उगमस्थानाचे, काठाचे पावित्र्य जपण्यात आले असून स्वच्छता, नितळ सौंदर्यही अबाधित राखण्यात आले आहे. आम्ही मात्र नद्यांचे-पर्वतांचे  मारेकरी आहोत.  ज्या ताटात जेवतो त्या ताटाला छिद्र पाडू नये अशा आशयाची एक म्हण प्रचलित आहे, पण याबाबत आता छिद्राची जागा विहिरीएवय़ा आकाराने घेतली आहे. ज्या अमरकंटक येथे नर्मदा नदी उगम पावते, तेथील नैसर्गिक स्रोत धोक्यात सापडला आहे. अमरकंटक येथील लोकसंख्या 1980च्या दशकांत दोन हजार होती आणि आता दरवर्षी पाच ते सात लाख भाविक भेट देतात. तेथे घनदाट जंगल होते आणि लहानसहान धबधबेदेखील. तेही इतिहासजमा झाले. नद्या, पर्वतरांगा, जंगलावर आपण खूप बोलतो आणि बोलत राहू. नदीकाठावर मद्यपान करणे, मांसाहार ते नित्य कर्म आणि प्लॅस्टिक बॅन यांसारख्या गोष्टी अमलात आणल्या जातील. नर्मदा परिक्रमा होत राहील, अमरकंटक येथे आश्रम अणि धर्मशाळेचे प्रमाण वाढत जाईल. पुण्य कमावणाऱया भाविकांची संख्या वाढतच जाईल. पिकनिक करणारे आणि रील तयार करून मजा करणाऱयांची संख्यादेखील घटणार नाही. नर्मदा असो किंवा कृष्णा, गंगा किंवा यमुना, या नद्या श्रद्धास्थानी आहेत. दुर्दैव म्हणजे आपणही तेवढय़ाच प्रमाणात तेथे श्रद्धेने कचरा टाकत राहू. अर्थात हा मुद्दा केवळ नदी, पर्वत, जंगलापुरताच मर्यादित नाही, तर आपला दृष्टिकोन आणि वर्तनाशी संबंधित आहे. म्हणूनच स्त्री पूजेबाबत म्हटले आहे,यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता असे असतानाही आज कोलकाता येथे महेलांच्या सन्मानासाठी संघर्ष करणाऱयांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे.