वेब न्यूज – अनोखे तुरुंग

तुरुंग म्हटले की, भल्या भल्या गुन्हेगारांना घाम फटतो. सर्वसामान्य माणसाबद्दल तर बोलायलाच नको. तुरुंग म्हटले की, अंधाऱ्या खोल्या, बेचव कच्चे जेवण, स्वच्छतेची वानवा, एकटेपणा अशा अनेक भीतीदायक गोष्टी आपल्या डोळ्यासमोर उभ्या राहतात. मात्र सध्या जगातील काही अनोखे तुरुंग त्यांच्यामध्ये असलेल्या सोयी-सुविधांमुळे चर्चेत आलेले आहेत. गुन्हेगाराला शिक्षा ही मिळायला हवी, मात्र त्याला सुधारण्याची संधीदेखील मिळायला हवी. त्याला इतर सामान्य लोकांप्रमाणे आयुष्य जगण्याची संधी मिळायला हवी, अशा उद्देश्याने ह्या तुरुंगांचा कारभार चालतो.

नॉर्वेच्या बोस्टॉय बेटावरच्या तुरुंगात 100 पैदी आहेत. इथे पैद्यांना टेनिस, हॉर्स रायडिंग, सन बाथ अशा सुविधा उपलब्ध आहेत. इथे पैद्यांना शेती करता येते, तसेच राहण्यासाठी कॉटेजेसचीदेखील व्यवस्था करण्यात आली आहे. स्कॉटलंडच्या एचएमपी एटीवेल या तुरुंगात 700 पैदी राहतात. या पैद्यांना चाळीस आठवडे विविध उत्पादने बनवण्याचे प्रशिक्षण दिले जाते. तसेच कौशल्याची इतर कामे शिकण्यासदेखील प्रोत्साहन देण्यात येते. स्वित्झर्लंडच्या चेपा डॉलन या एकेकाळी पुप्रसिद्ध असलेल्या तुरुंगाचे आता नूतनीकरण करण्यात आले असून पैद्यांना राजेशाही सुविधा देण्यात येत आहेत.

स्पेनच्या एरन्जुएन या तुरुंगात पैद्यांना चक्क त्यांच्या पुटुंबासमवेत राहण्याची परवानगी आहे. मुलांना आपल्या आई-वडिलांचा एकत्र सहवास मिळावा आणि पालकांना देखील त्यांची जबाबदारी समजावी यासाठी ही सुविधा देण्यात येते. इथे लहान मुलांसाठी भिंतीवर विविध कार्टून्स रेखाटण्यात आली आहेत. मुलांसाठी शाळा आणि खेळाचे मैदानदेखील उपलब्ध करून देण्यात आले आहे. इथे एपूण 32 कॉटेजेस आहेत, ज्यात पैदी सहपुटुंब राहतात. जस्टीस सेंटर लिबोयेन हा पूर्णपणे काचेने आच्छादलेला ऑस्ट्रीयाचा तुरुंग एखाद्या पंचतारांकित हॉटेलला लाजवेल असा आहे. इथे स्पोर्टस् सेंटर, जिम, राहण्यासाठी आलिशान खोल्या देण्यात आल्या आहेत. या खोल्यांमध्ये टीव्ही, फ्रीज अशा सुविधादेखील आहेत. इथे शिक्षा भोगणाऱ्यांना पैदी म्हणावे का राजा, अशा प्रश्न पडतो.

स्पायडरमॅन