
>> रामदास खरे
कुणी नोकरीसाठी, कुणी व्यवसायासाठी तर कुणी शिक्षणासाठी मराठी भाषिक मंडळी जगाच्या पाठीवरील विविध देशांमध्ये जात असतात. तिथल्या एकूण परिस्थितीशी जुळवून घेतात. म्हणजे तिथले हवामान, तिथली भाषा, तिथल्या माणसांचे स्वभाव, कायदे कानून, खाद्यसंस्कृती, लोकसंस्कृती इत्यादी या साऱयांशी मैत्री करतात आणि त्याच देशातले होऊन जातात. सुरूवातीला त्यांना सुप्त आकर्षण असते तेथील स्वच्छतेचे, कठोर नियमांचे, हायफाय लाईफस्टाईलचे. ते त्यात गुंतूनही जातात. मग होलिकोत्सव येतो, पाडवा येतो, श्रावणातले सणवार येतात, गणेशोत्सव पाठोपाठ नवरात्रोत्सव येतो आणि सणांचा राजा म्हणजे दिवाळी सण येतो. याचवेळी परदेशात राहणाऱया मराठी मंडळींच्या डोळ्याच्या कडा ओलावतात. एका क्षणात त्यांना ते जुने मंतरलेले दिवस आठवतात. पण नोकरीच्या, व्यवसायाच्या, शिक्षणाच्या अपरिहार्य पात तो शांत बसून मनाशी ठरवतो. आपण एन्जॉय केलेले ते मंतरलेले क्षण आपण पुन्हा जगायचे, तेही इथल्या परक्या मुलखात. अशी सणवारांचे, उत्सवाचे अधुरे स्वप्ने पाहिलेली एकेक गुणी कलाकार मंडळी एकत्र येतात आणि तो क्षण, तो उत्सव आणि तो जल्लोष पुन्हा पुन्हा नव्याने जगतात, आपल्या मराठमोळ्या मातीचे गुणगान गातात.
याच पार्श्वभूमीवरचे एक वेगळेच पुस्तक माझ्या हाती आले. `गुणीजनांचे कलाविष्कार!’ हे असे एक अनोखे पुस्तक आहे की ज्यात अमेरिका, ऑस्ट्रेलिया, लंडन, जर्मनी, आफ्रिका, जपान, सिंगापूर अशा विविध देशातील मराठमोळ्या कलाकारांनी साकारलेली एक अनोखी कलेची दुनिया आपल्याला गवसते. तेथील मराठी भाषेसाठी, भारतीय संस्कृती, परंपरा जतनासाठी जणू आपल्याला हलकेच साद घालते. आजच्या आघाडीच्या कवयित्री, अभिनेत्री, उत्तम संवादिका मेघना साने यांनी हे पुस्तक साकारले आहे. विविध सांस्कृतिक कार्पामांच्या निमित्ताने विविध देशातून मेघनाताईंना आमंत्रित केले जाते. त्या-त्या देशात गेल्यावर तिथली भाषा, संस्कृती, परंपरा त्या जाणून घेतात. विविध क्षेत्रातील मराठी बांधवांशी त्या संवाद साधतात. आलेले अनुभव, किस्से, भेटलेली माणसे, निरीक्षणे त्या शब्दबद्ध करतात. मराठी माणूस कुठल्याही देशात गेल्यावर तो आपल्या भारताला, इथल्या संस्कृतीला, विविध सणांना अजिबात विसरत नाही. त्यासाठी महाराष्ट्र मंडळ उत्तम काम करतात.
एकूण एकतीस लेखांतून मेघनाताई परदेशातील आणि भारतातील विविध सांस्कृतिक उपामांचा, लक्ष आठवणींचा, मौलिक माहितीचा, किस्से आणि त्यांना साथ देणाऱया परदेशातील मैत्रिणींचा परिचय करून देतात. `मराठी भाषेचे प्रेम` केवळ सगळ्यांसाठी हाच एक कॉमन धागा होता हे आपल्याला पानोपानी जाणवते. `महाराष्ट्र मंडळ सिंगापूर’तर्फे मराठी भाषेचे जतन व संवर्धन करण्यासाठी अनेक उपाम राबवले जातात. नॉर्थ अमेरिकेत इंडियन हेरीटेज अँड कल्चर असो. तर्फे गेली अनेक वर्षे सातत्याने बहुभाषिक लघुनाटिका, नाटय़दर्पण, नृत्यदर्पण कार्पाम आयोजित करीत असते, अमेरिकेतील शास्त्राrय संगीत शिक्षण या दोन लेखातून शास्त्राsक्त गाणे, इन्स्ट्रुमेंटल संगीत कसे शिकवले जाते तसेच टेम्पा बे येथील पंडित जसराज स्कूल
ऑफ म्युझिक संस्थेची माहिती मिळते. 1997 पासून आकाशवाणी सिडनी या केंद्राने केलेली कामगिरी थक्क करणारी आहे. स्विझर्लंडमधील मराठी जग हा लेख आवर्जून वाचण्यासारखा. आफ्रिकेतील नैरोबी येथील महाराष्ट्र मंडळ सर्वात जुने. केनिया, नायजेरिया इथल्या मराठी भाषिकांचा गणेशोत्सवाला प्रचंड रिस्पॉन्स मिळतो. फ्रँकफर्ट (जर्मनी) येथे 2014 मध्ये स्थापन झालेला `मराठी कट्टा’ भारतीय खाद्यसंस्कृती बरोबरच मराठमोळे कार्पाम दणक्यात आयोजित केले जातात. शिकागो विद्यापीठात मराठी भाषा शिकविणाऱया डॉ सुजाता महाजन याचा परिचय आपल्याला होतो.
आपल्या मनोगतातून लेखिका मेघना साने आपल्याशी संवाद साधतात ` कोवळी उन्हे’ हा माझा कथा-काव्याचा कार्पाम सादर करण्याच्या निमित्ताने अनेक देशांची सैर करायला मला मिळाली.’ हरहुन्नरी व्यक्तिमत्व लाभलेल्या मेघनाताईंनी देशपरदेशातील मराठी भाषिकांमध्ये हा संवादाचा पूल बांधण्याचे काम केले आहे हे महत्वाचे.
गुणीजनांचे कलाविष्कार
लेखिका : मेघना साने
प्रकाशक : उद्वेली बुक्स, ठाणे.
पृष्ठ : 148, मूल्य : रु. 400/-