साहित्यविचार- साद मराठी मुसलमानाची

>> इसहाक बिराजदार

महाराष्ट्राच्या भूमीचा कण न् कण साक्षरकारी संतांच्या पदस्पर्शाने आणि वीरांच्या रुधिराने पावन झालेला आहे. संतांच्या परतत्वाच्या स्पर्शाने पवित्र झालेली ही महन्मंगल भूमी अलम मानवजातीसाठी मांगल्याचा स्रोत आहे. इथे भक्ती आणि शक्तीचा अपूर्व संगम आढळतो. मराठी मातीच्या स्नेहल कुशीतून मुसलमानांची जीवनवेल उगवलेली आहे, फुललेली आणि मोहरलेली आहे. त्याचा पिंड अस्सल मराठी मातीवर पोसल्याने त्याच्या आचारविचारांत बाळबोध सौजन्याची अमीट छाप दिसते. मुसलमान असला तरी उपजतच त्याला मराठीचा वारसा लाभलाय आणि त्याने ते आपल्या मनाच्या कुपीत जिवाच्या जिव्हाळ्याने जतन केलाय. मराठी त्यांचा ध्यास, श्वास आणि उच्छवास आहे. अमृताते पैजा जिंकणाऱया वाणीशी तो एकरुप झालाय जैसे –

लवण मेळविता जळे। काय उरले निराळे 

तैसा समरस जालो । तुममाजी हरपलो

साहित्यविचार

इसहाक बिराजदार

साद मराठी मुसलमानाची

मराठी मातीनेच त्याला घडवले, मढवले. त्याने ग्यानबातुकोबांच्या वाणीचा अवीट गोडीचा रस चाखला आहे. परतत्वाचा स्पर्श झालेल्या ज्ञानदेवांच्या वाणीने, दिव्यत्वाच्या तेजाने तो दिपून गेला आहे, जसे…

विश्वाचे आर्त माझिया मनी प्रकाशले

अवघेची झाले देह ब्रम्ह

सुंदर सुरेख ओतिले परब्रम्ह तेज फाकिले

धर्माचं मर्म सहज सोप्या शब्दांत ज्ञानेश्वर माऊलीने सांगितले आहे. `राम राम अवघोची म्हणती। कोणी न जाणती आत्माराम’ या तुकोबांच्या अमरवाणीने त्याला अंतर्मुख केले. लोक कर्मकांडाच्या कर्मात आकंठ रुतलेत. खरा सनातन धर्म ग्यानबा तुकोबांच्या अमृत वाणीत आढळतो.

जे जे भेटे भूत । ते ते मानिजे भगवंत

जनचि दिसे जनार्दन

भक्ती ही फक्त भक्ती असते, तिला धर्मजातीचे पाश नसतात याची अनुभूती मराठी संतांनी दिल्याने इथला मुसलमान भावविभोर झालाय. `भावभक्तीविण अवधेची शीण’ याची प्रचीती त्याला झाली. त्याला आत्मभान आले की – धर्माला देव असतो, पण देवाला धर्म नसतो.

मराठी संतांनी धर्म – जातीची बंधने झुगारली. सत्कर्म, सदाचारावर भर दिला. मानवाची शिकवण दिली आणि मानवातच माधव असल्याचा दृष्टांत दिला. `जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप’ असा एल्गार केला. `अवघे जन मज जाले लोकपाळ’चा संदेश दिला. ज्ञानदेवापासून प्रेरणा घेऊन हुसेन अंबर खान यांने ओवीबद्ध  गीताटीका लिहिला. 700 श्लोकांवर 871 ओव्या रचल्या. तो `अंबरहुसेनी’ या ग्रंथाची सुरुवात श्लोकस्तवनाने करतो, –

भेदाभेदाचा आग्रह उदंड तोचि विघ्रसमूह प्रचंड

तयाते नाशिता जो पातुण्ड तथा नमस्कारु

श्रीगोंद्याचे शेख महंमद आपल्या `योगसंग्राम’ ग्रंथाचा प्रारंभ ओंकार आणि श्रीरामाच्या नावाने करतात.

ओम् नमोजी अव्यक्त रामा परात्पन तू मेघश्यामा

आलमखान हा संत शारदेच्या चरणी तिच्या कृपाप्रेमाची याचना करतो –

अहो, शारदे जननी वेदमाता

तुझे स्मरण कीर्तनी गीत गाता

आलमखान म्हणे आरंभासी येई

आपले कृपेचे मजला प्रेम देई

मुंतोजी ब्राम्हणी यांनी वेदांतावर श्रेष्ठ दर्जाचे नऊ ग्रंथ लिहिले आहेत. आपल्या ग्रंथांच्या माध्यमाने त्यांनी उपनिषद, वेदशास्त्रांचे सार आणि सिध्दांतीचे बीजाक्षर यांचे परमार्थिक विवेचन विस्ताराने केले आहे. मुसलमान मुंतोजी यांनी हिंदू बांधवांच्या श्रध्दासंकेतांशी तादात्म्य साधले आहे. शहामुनी या मुसलमान मराठी संतांनी `सिध्दान्तबोध’ हा ग्रंथ रचला. भिन्न भिन्न पुराणातल्या उत्कृष्ट कथा, रामायण, महाभारतातील सुंदर आख्यान आणि वेदांताविचारांचे तेजस्वी कंगोरे लाभलेला हा ग्रंथ मराठी वाड्मयातील चकाकणारा हीरा असला तरी अरसिकतेमुळे त्याला उपेक्षा लाभली. मराठी मुसलमान संत कवींच्या आणि शाहिरांच्या असंख्य रचना मनाला भावणाऱया आणि भारावून टाकणाऱया आहेत, त्या सर्वांचा परामर्श घेणे येथे शक्य नाही. खंत या गोष्टीची आहे की एक -दोन अपवाद वगळता मराठी सारस्वतांनी त्यांची दखल घेतली नाही.

मुसलमानांच्या आाढमणापूर्वी इथल्या समाजजीवनात अनेक दोष, त्रुटी होत्या. इथल्या तळागाळातील समाजघटकांना माणूस असूनही माणसांचे हक्क मिळत नव्हते. पशूहून हीन जीवनमान त्यांच्यावर लादण्यात आले होते. सत्शील संत चोखामेळा यांनी या विटाळाला किटाळाला शब्दरूप दिले.

अवघ्या वर्णामाजी हीन केली जाती

विटाळ विराळ म्हणती क्षणोक्षणी

कोणीही अंगीकार न करिता माझा

दूर दूर हो जा अवघं म्हणती

याही पुढे जाऊन ते म्हणतात –

चोखा उभा बाहेरी, तुमच्या उष्टय़ासाठी पदर पसरी

चोखा तुमच्या उच्छीष्टाचा दास

चोखामेळासारख्या सदाचारी, सदगुणी संताची अशी दुर्दशा तर सामान्यांच्या काय हालअपेष्टा असतील याची कल्पना करवत नाही. जातीय अन्याय व अत्याचारांच्या हृदयद्रावक रचना लिहिणारे सोयराबाई, कर्ममेळा, बंकामहाराज, निर्मळा, भागू यांना जगण जडशीळ झाल्याचं जाणवत आणि त्यामुळे मती गुंग आणि मन सुन्न होते.

कालबाह्य रुढी, परंपरा, अमानुष आणि अमानवी प्रथा आणि परंपरेच्या जीवघेण्या जाचातून मुक्त होण्यासाठी आपलीच तळागाळातील माणसे फक्त माणूस म्हणून जगण्यासाठी परधर्मात गेली. हिंदूंच्या जातीभेदामुळे इस्लामची मुळे भारतभूमीत रुजली हे सत्य स्वीकारायला हिम्मत लागते. रियासतकार गोविंद सखाराम सरदेसाई म्हणतात की, `इथले बहुसंख्य मुसलमान हे बाटके हिंदू आहेत.’ समर्थ रामदास सुध्दा आपल्या `दासबोध’ ग्रंथातील 14 व्या दशकात लिहितात,

कोणी दावलमलकासजाती, कोणी पीरास भजती

कोणी तुरक होती आपुले इच्छेने

आपल्या मराठी संतांच्या रसाळ व मधाळ वाणीने निर्मळ अंतकरणाने आणि शुध्द आचरणाने समाजमन सांधले. शिवप्रभूंनी रयतेला पोटच्या मुलासारखं सांभाळून आणि युवकांना `मावळे’ संबोधून आपल्या जिवाचे मैत्र बनवले.

मोगलाईचा शोचनीय अंत झाला, शिवशाही ओसरली, पेशवाईसुद्धा बुडाली आणि भारतात ब्रिटिशांची सत्ता आली. इथल्या हिंदू-मुस्लिमांच्या अभेद्य एकजुटीने ब्रिटीश हादरले आणि त्यांनी  उभय समाजामध्ये भेदनीतीचे विष पेरले. एकेकाळी एकसंध असणारा समाज दुभंगला. माणसे एकमेकांपासून दुरावू लागली. तुटू लागली, एकमेकांचा द्वेष करू लागली. धर्माच्या नावाने भ्रमनिष्ठा रुजवण्याच्या कार्याने वेग धरला आणि माणसांना एकमेकांपासून तोडणाऱया यंत्रणा मोठय़ा प्रमाणात कार्यरत झाल्या. मराठी मुसलमान आपला असतानाही त्याच्याकडे संशयाने पाहिले जाते, त्याने मुस्लिम सत्ताधाऱयांच्या विरोधात शिवछत्रपतींना इमाने इतबारे साथ दिली, आपले प्राण अर्पण केले. पण गद्दारी केली नाही. माझ्या मराठी मायबाप हो मराठी मुसलमान मायमराठीची प्रीती जीवी धरुन, संतांची पायधूळ होऊन आणि शिवरायांची स्मृती मनाच्या कुपीत जतन करुन तो आपल्या जन्माचे सार्थक करीत आहे.

बातुकोबांच्या वाणीचा अवीट गोडीचा रस चाखला आहे. परतत्वाचा स्पर्श झालेल्या ज्ञानदेवांच्या वाणीने, दिव्यत्वाच्या तेजाने तो दिपून गेला आहे, जसे…