
>> गणेश आचवल
काही वर्षांपूर्वी “सा रे ग म प”चे दहावे पर्व साजरे झाले. त्या दहाव्या पर्वात दहा वादकांपैकी कीबोर्ड वादक म्हणून आपल्याला एक नाव परिचयाचे झाले. तो कीबोर्ड वादक म्हणजे सागर साठे! गौरव महाराष्ट्राचा, झी मराठीवरील “झिंग झिंग झिंगाट” हा कार्पाम, अनेक मराठी वाद्यवृंद, मिफ्टा अवॉर्डस् सोहळा… अशा कार्पामातून आपल्याला परिचित असणारा सागर साठे या क्षेत्रात पंधरा वर्षांपेक्षा अधिक काळ कार्यरत आहे.
शाळेत दुसरी-तिसरीमध्ये असताना सागरला हार्मोनियम शिकण्याचे मार्गदर्शन अनिल केरकर यांच्याकडून मिळाले. सागरला या कलेची आवड निर्माण झाली. त्याच्या मामेआजोबांनी त्याला एक छोटासा कीबोर्ड घेऊन दिला. त्यावर तो विविध गाणी वाजवू लागला. त्याच सुमारास सतीश बोंतल हेसुद्धा त्याला कीबोर्ड शिकवायला घरी येत असत. हिंदी गाणी, त्याचे नोटेशन्स कसे लिहायचे या गोष्टींचे मार्गदर्शन देखील त्याला लाभले. शाळेत असतानाच ‘सांजरंग’ नावाच्या अनिल केरकर यांच्या वाद्यवृंदात कीबोर्ड वर साथ करण्याकरिता सागर सहभागी होऊ लागला. ‘स्वरपंचम ‘ नावाच्या वाद्यवृंदात देखील सागर कीबोर्ड वादन करत होता.
शाळेतील अनेक स्पर्धांमधून सागरला हार्मोनियम वादनासाठी पारितोषिके मिळाली आहेत. ‘सेवाभारती’ संस्थेतर्फे शाळेतील विद्यार्थ्यांकरिता झालेल्या स्पर्धेत ज्यांना बक्षिसे मिळायची, त्यांना उद्यान गणेश मंदिरात कार्पाम करण्याची संधी मिळत असे. वर्षा भावे यांच्या ‘कलांगण’ संस्थेचा असा एक कार्पाम उद्यान गणेश मंदिरात सादर झाला आणि त्या कार्पामात सागरला पेटी वादनाची संधी मिळाली. तो ‘कलांगण’ संस्थेच्या अनेक कार्पामातून सहभागी होऊ लागला. हिंदुस्थानी शास्त्राrय संगीताचे मोलाचे मार्गदर्शन वर्षाताई भावे यांच्याकडून सागरला मिळाले. संगीत क्षेत्रातच करिअर करायचे हे त्याने शालेय शिक्षण घेत असतानाच ठरवले होते. सागरचे ज्युनिअर कॉलेजचे शिक्षण पोदार कॉलेज तर पदवीचे शिक्षण रुपारेल कॉलेजमधून झाले.
कमलेश भडकमकर यांच्याकडून सागरला खूप मोलाचे मार्गदर्शन लाभले. संगीत संयोजन म्हणजे नेमके काय, कीबोर्ड वादन करताना त्यातील बारकावे कसे असावेत अशा अनेक गोष्टींचे मार्गदर्शन कमलेश भडकमकर, सत्यजित प्रभू यांच्याकडून त्याला मिळाले. सुप्रसिद्ध गायिका उत्तरा केळकर, वैशाली सामंत, सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर, संगीतकार अशोक पत्की, अवधूत गुप्ते यांच्या सांगीतिक कार्पामातून सागर कीबोर्ड वादन करू लागला. त्याने अमेरिका, लंडन, सिडनी, दुबईमध्ये विविध कार्पामातून कीबोर्ड वादन केले आहे. शाळेत असतानाच शारदा संगीत विद्यालय यांच्यातर्फे दिल्या जाणाऱया पंडित पलुस्कर ट्रॉफीचा तो मानकरी ठरला होता. तर इंद्रधनू संस्थेच्या ‘सुधीर फडके युवोन्मेष पुरस्काराचा’ही तो मानकरी आहे. लॉकडाउढनच्या काळात सागर अकॉर्डीयन वादनाकडे वळला. इंटरनेटच्या माध्यमातून यु-टय़ूब वरील विविध व्हिडीओ पाहून त्याने अकॉर्डीयन शिकण्यावर लक्ष केंद्रित केले. सध्या अनेक सांगीतिक कार्पामात कीबोर्ड आणि अकॉर्डीयन वादक म्हणून तो कार्यरत आहे.