
>> प्रा. डॉ. प्रवीण घोडेस्वार
प्रख्यात विचारवंत, समीक्षक आणि सामाजिक कार्यकर्त्या गायत्री चक्रवर्ती स्पिवाक यांची 2025 च्या हॉलबर्ग संशोधन पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. शैक्षणिक क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठत आंतरराष्ट्रीय पुरस्कारांपैकी एक असलेला हॉलबर्ग पुरस्कार दरवर्षी मानव्यविद्या, सामाजिकशास्त्रे, कायदा किंवा धर्मशास्त्रात उत्पृष्ट योगदान दिलेल्या विद्वानाला देण्यात येतो. यासाठी नॉर्वेजियन सरकार निधी देत असते. प्रख्यात लेखक आणि तत्त्वचिंतक लुडविग हॉलबर्ग यांच्या नावाने देण्यात येणाऱया या पुरस्काराची रक्कम पाच लाख 15 हजार युरो अर्थात तब्बल चार कोटी 6 लाख एवढी घसघशीत असून येत्या 5 जून रोजी बर्गन विद्यापीठात गायत्री यांना तो प्रदान करण्यात येईल.
गायत्री 2007 पासून जगत्विख्यात कोलंबिया विद्यापीठात मानव्यविद्या विद्याशाखेत प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्या विद्यापीठातील ‘तुलनात्मक साहित्य आणि समाज’ या विभागाच्या संस्थापक सदस्या असून शैक्षणिक वर्तुळात त्यांचे नाव अतिशय आदराने घेतले जाते. 1970 च्या दशकापासून त्यांनी आपल्या शैक्षणिक कार्याचा ठसा उमटवायला सुरुवात केली. त्यांनी 1988 मध्ये लिहिलेल्या ‘पॅन द सबअल्टर्न स्पीक?’ या निबंधाने त्या प्रकाशझोतात आल्या. हा निबंध म्हणजे वसाहतोत्तर अभ्यासाचा पेंद्रबिंदू असून यात त्यांच्या शैक्षणिक आणि नैतिक विश्लेषणाचे मूलभूत तत्त्व प्रतित झाले आहे. मुख्य धारेच्या चर्चाविश्वात समाजातील सीमांतिक गटांच्या आवाजांना वगळले जाते आणि साहित्य त्या आवाजांना जोवर सामावून घेत नाही तोपर्यंत ते सर्वसमावेशक किंवा ‘सार्वत्रिक’ असल्याचा दावा करू शकत नाही. गायत्री यांनी वादग्रस्त रूढी आणि सांस्पृतिक संस्था यात गुरफटलेल्या सीमांतिक समाजघटकातील स्त्रियांवर लक्ष पेंद्रित करून महत्त्वपूर्ण काम केले आहे.
गायत्री यांचा जन्म 24 फेब्रुवारी 1943 रोजी कोलकाता येथे झाला. त्यांनी कोलकाता विद्यापीठात आणि नंतर काॅर्नेल विद्यापीठात शिक्षण घेतले. गेल्या काही वर्षांत गायत्री यांनी महाश्वेता देवींसारख्या शिक्षणतज्ञ आणि लेखिका-कार्यकर्ती सोबत जवळून काम करून बंगालशी असलेले त्यांचे नाते जिवंत ठेवले आहे. त्यांनी ‘द्रौपदी’ लघुकथेच्या केलेल्या अनुवादामुळे सशक्त आणि विस्मयकारक मजपूर व्यापक वाचकांपर्यंत पोहोचवण्यास मदत झाली. आपल्या अनुवादाच्या प्रस्तावनेत त्या म्हणतात की, ‘मी या बंगाली लघुकथेचे इंग्रजीत भाषांतर त्याचा खलनायक, सेनानायकसाठी जितके केले तितकेच त्याचे शीर्ष पात्र द्रौपदीसाठीही केले. सेनानायकमध्ये मला तिसऱया जगाच्या शोधात असलेल्या पहिल्या जगातील विद्वानाचे प्रतिबिंब दिसते. म्हणून मी प्रथम त्याच्याबद्दल बोलेन.’
गायत्री यांच्यासाठी अनुवाद ही ज्ञानाचे लोकशाहीकरण करणारी एक खोलवरची राजकीय आणि तात्त्विक कृती आहे. त्यांनी फ्रेंच तत्त्वज्ञ जॅक डेरिडा यांच्या ‘ऑफ ग्रामॅटोलॉजी’ या ग्रंथाचे भाषांतर केले आहे. यामध्ये लेखकाने विघटनाच्या संकल्पनेची मांडणी केली आहे. मांडली आहे. ‘पाश्चात्य तत्त्वज्ञानातील मूलभूत वैचारिक भेदांवर किंवा विरोधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा प्रकार म्हणजे विघटन’ अशी व्याख्या ब्रिटानिकाने केली आहे. गायत्री यांच्या गाठीशी भारतातील सर्वात गरीब भागातील स्वयं-अनुदानित प्राथमिक शाळांमध्ये शिकवण्याचा अनुभव आहे. हॉलबर्ग पुरस्काराच्या सन्मानपत्रात म्हटल्याप्रमाणे, ‘गायत्री यांच्यासाठी, बौद्धिक वसाहतवादाला पर्याय देण्यासाठी स्थानिक उपक्रमांसह उच्चतम सर्जनशीलता एकत्र आली पाहिजे.’ गायत्री यांनी नऊ पुस्तके लिहिली आहेत. त्यापैकी सर्वात प्रभावी आणि गाजलेले पुस्तक म्हणजे ‘अ क्रिटिक ऑफ पोस्टकोलोनियल रीझनः टूवर्ड्स अ हिस्ट्री ऑफ द व्हॅनिशिंग प्रेझेंट’. त्यांनी इतरही अनेक पुस्तके लिहिलीत, संपादित आणि अनुवादित केली आहेत. गायत्री यांना भारत सरकारने पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे. तुलनात्मक साहित्य, अनुवाद, वसाहत्तोर अध्ययन, राजकीय तत्त्वज्ञान आणि स्त्राrवादी सिद्धांतनातील त्यांच्या श्रेष्ठतम आंतरविद्याशाखीय संशोधनासाठी गायत्री या पुरस्काराच्या मानकरी झाल्या आहेत.