पश्चिमरंग – डान्स मकाब्र

>> दुष्यंत पाटील

 

फ्रेंच लोकांच्या समजुतीप्रमाणे  हॅलोविनच्या रात्री बारा वाजता आपले व्हायोलिनसारखे दिसणारे वाद्य घेऊन मृत्यू येत होता. ही वेळ दर्शविण्यासाठीच हार्पवर एक स्वर बारा वेळा वाजत होता. फ्रेंच लोकांच्या कल्पनेप्रमाणे मृत्यू व्हायोलिनसारखे वाद्य घेऊन येत होता. त्यामुळे सें सांसच्या सिम्फोनिक पोएममध्ये मृत्यूचे संगीत व्हायोलिनवर येत होते.

 

ध्ययुगीन काळात फ्रान्समधल्या लोकांमध्ये एक विचित्र समज होता. त्यांना वाटायचं की, हॅलोविनच्या रात्री कब्रस्तानमध्ये व्हायोलिनसारखं एक वाद्य घेऊन मृत्यू येतो. मध्यरात्री आपलं वाद्य घेऊन मृत्यूचं वादन सुरू होतं. हे संगीत सुरू झाल्यावर कबरींमध्ये असणारे मृत व्यक्तींचे सांगाडे हळूहळू बाहेर येतात. मग मृत्यूच्या संगीतावर त्या सांगाड्यांचे नृत्य सुरू होतं. हा सारा प्रकार पूर्ण रात्रभर चालतो. पहाट झाल्यावर कोंबडा आरवल्यानंतर मात्र हा खेळ संपतो. यानंतर सारे सांगाडे आपापल्या कबरींमध्ये जातात, ते पुढच्या वर्षीची हॅलोविनची रात्र येईपर्यंत!

हाच विषय घेत एकोणिसाव्या शतकात हेन्री कॅझालिस नावाच्या कवीने एक कविता रचली. खरं तर कॅझालिस डॉक्टर होता, पण त्याला कविता रचायला आवडायचं. कदाचित डॉक्टर असल्यामुळे त्याने ‘मृत्यू’ हा प्रकार जवळून पाहिला असावा. त्याला मृत्यूसारख्या विषयावर कविता लिहिणं आवडायचं. वर वर्णन केलेल्या विषयावर (हॅलोविनच्या रात्री मृत्यूच्या संगीतावरचं सांगाड्यांनी केलेलं नृत्य) त्याने रचलेली ‘डान्स मकाब्र’ ही कविता खासच होती. महान फ्रेंच संगीतकार सें सांस याचं लक्ष ही कविता खेचून घेणार होती.

1872 मध्ये सें सांसने कॅझालिसच्या कवितेला संगीत दां. या संगीत रचनेत फक्त गायकाचं गायन आणि त्याला साथ  देणारा पियानो इतकंच  होतं. 1874 मध्ये सें सांसने ही संगीत रचना ‘सिम्फोनिक पोएम’ या प्रकारात नव्याने लिहिली. आधीच्या रचनेत असणारं गायकाने गायचं गीत या सिम्फोनिक पोएममध्ये व्हायोलिनवर वाजत होते. साथ द्यायला पूर्ण ऑर्केस्ट्रा होता. या सिम्फोनिक पोएममध्ये सुरुवातीला ‘हार्प’ या वाद्यावर एकच स्वर बारा वेळा वाजत होता. फ्रेंच लोकांच्या समजुतीप्रमाणे

हॅलोविनच्या रात्री बारा वाजता आपलं व्हायोलिनसारखं असणारं वाद्य घेऊन मृत्यू येत होता. ही वेळ दर्शविण्यासाठीच हार्पवर एक स्वर बारा वेळा वाजत होता.

यानंतर संगीत रचनेत मृत्यूचा प्रवेश होत होता. फ्रेंच लोकांच्या कल्पनेप्रमाणे मृत्यू व्हायोलिनसारखं वाद्य घेऊन येत होता. त्यामुळे सें सांसच्या सिम्फोनिक पोएममध्ये मृत्यूचं संगीत व्हायोलिनवर येत होतं. सें सांसने या संगीतात एका खास गोष्टीचा वापर केला होता. संगीतातले भाव आणण्यासाठी स्वरांमधलं अंतर संगीत रचनेत खूप महत्त्वाची ठरतात. तीन पूर्ण स्वर इतके अंतर असणारे स्वर एकत्र वाजले की, एक विशिष्ट परिणाम साधला जातो (उदा. हार्मोनियममधली पहिली पांढरी आणि तिसरी काळी यांच्यामधले अंतर). या अंतराला ‘संगीतातला सैतान’ असंही म्हटलं जातं. नेमकं हेच अंतर वापरत सें सांसच्या रचनेत मृत्यूचा प्रवेश होत होता. यामुळे मृत्यूचा खास परिणाम साधला जात होता. सांगाड्यांचं नृत्य चालू असताना त्यामधली हाडं एकमेकांवर आदळून कसा आवाज येईल? नेमका तसाच आवाज आणण्याचा प्रयत्न संगीतकाराने संगीत रचनेत ‘झायलोफोन’ नावाच्या वाद्याचा विशिष्ट प्रकारे वापर करत केला. संगीत रचनेच्या शेवटी ‘ओबो’ वाद्याचा वापर करत सें सांसने कोंबडा आरवण्याची आठवण करून दिली. यानंतर सांगाडे पुन्हा आपापल्या कबरींमध्ये जात असल्याचं संगीत रचनेचा शेवटात होता. हे संगीत 1875 मध्ये पहिल्यांदाच लोकांसमोर सादर करण्यात आलं, पण लोकांना मृत्यूच्या नृत्याची कल्पना आवडली नाही. त्यामुळे या संगीताच्या सादरीकरणाला सुरुवातीला थंड प्रतिसाद मिळाला. नंतर मात्र हे संगीत लोकप्रिय होऊ लागलं.

लोकांसमोर हे संगीत सादर झाल्यानंतर काही दिवसांतच फ्रॅन्झ लीस्ट या विश्वविख्यात संगीतकाराने ही रचना फक्त पियानोवर वाजवता येईल अशी अॅरेंजमेंट केली. कालांतराने या रचनेच्या अनेक अॅरेंजमेंट्स झाल्या. 1942 मध्ये व्लादिमिर होरोविट्झ नावाच्या महान पियानोवादकाने फ्रॅन्झ लीस्टच्या अरेंजमेंटमध्ये बरेच बदल केले. होरोविट्झने केलेले बदल असणारी रचना आजही आवडीने ऐकली जाते. आजपर्यंत हे संगीत कित्येक चित्रपटांमध्ये, टीव्हीवरच्या मालिकांमध्ये, जाहिरातींमध्ये खूप वेळा वापरण्यात आलंय. जवळपास दीडशे वर्षांपूर्वी रचलेलं हे संगीत (एaग्हू-एaाहे अहा श्aम्aंrा) आजही का लोकप्रिय असावं हे पाहण्यासाठी आपण ते यूट्यूबवर ऐकायला हवं!

z [email protected]