![_book review](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/book-review-1-696x447.jpg)
>> सरिता रेणके
‘आभाळ शोधताना’ हे पुस्तक म्हणजे संभाजी बाळू भोसले यांची चरित्र कहाणी… त्यांच्याच शब्दांतली. शून्यातून सुरू झालेला प्रवास नव्याने पुन्हा समृद्धीच्या एका विशाल पडद्यावर सुरू होतो. कोल्हापूर जिह्यातील, गडहिंग्लज ता}gक्यातील नरेवाडीतील प्रतिकू} परिस्थितीवर मात करणारा अवलिया संभाजी. या संभाजीचे प्रेरणास्थान व दैवत छत्रपती शिवाजी महाराज. आयुष्यात कोणतेही नवीन आव्हान आले, संकट समोर दिसले की, या संभाजीला फक्त छत्रपती शिवाजीराजे डोळय़ांसमोर उभे राहतात व त्याला लढण्याची प्रेरणा देतात. परिस्थितीवर मात करण्याची शक्ती देतात. गावातून फक्त एक बाग व एक हजार रुपये घेऊन मुंबईत आलेला संभाजी छत्रपती शिवाजीराजे यांच्या प्रेरणेने ‘सुपर पासिलिटी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड‘ नावाने स्वतःचा व्यवसाय सुरू करतो, यशस्वी होतो व आता 3000 कर्मचाऱ्यांना घेऊन हा व्यवसाय वाढवीत आहे. या व्यवसायातून स्वतःचे, कुटुंबीयांचे आणि समाजातील इतरांचे जीवन समृद्ध करत आहे. शून्यापासून समृद्धीपर्यंतचा हा प्रवास विद्यार्थ्यांना, समाजाला तसेच फक्त कसेतरी जिवितार्जन करू इच्छिणाऱया युवकांच्या डोळय़ांत अंजन टाकणारा ठरेल.
या पुस्तकातून संभाजी बाळू भोसले यांनी जिद्दीने मिळवलेल्या यशाचे दर्शन घडते. त्यांच्या चरित्रावर आधारित असे हे पुस्तक तरुण पिढीला व्यवसायात यशस्वी कसे व्हावे यासाठी मार्गदर्शक ठरणारे आहे.