AI In Automotive – वाहन उद्योगात एआयची भरारी

>> कौस्तुभ जोशी

कुत्रिम बुद्धिमत्ता वाहन बदल घडवून आणत आहे. 2020 मध्ये वाहन उद्योगात कृत्रिम बुद्धिमत्तेचा साधारणपणे 30 टक्के सहभाग होता. त्याची व्याप्ती 2030 पर्यंत तब्बल 95 – 98 टक्के इतकी होणे अपेक्षित आहेत. अगदी काही वर्षांपूर्वी अशक्यप्राय वाटणाऱ्या संकल्पना प्रत्यक्षात येऊ लागल्या आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि संलग्न तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करून वाहन उद्योगाचा कायापालट याचा हा संक्षिप्त आढावा. त्यासाठी खालील प्रमुख मुक्ष्यांचा येथे आपण विचार करू.

स्मार्ट वाहनाच्या निर्मित्तीसाठी त्याही पेक्षा स्मार्ट निर्मितीप्रक्रियेची गरज असते. कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे संचलित यंत्रमानव वाहन उद्योगातील उत्पादन क्लिष्ट प्रक्रियेमध्ये महत्त्वाची भूमिका समर्थपणे बजावत आहेत. हे यंत्रमानव पारंपरिकयंत्रांच्या तुलनेत अतिशय वेगाने आणि तितक्याच अधूकतेने आपापले काम करतात. विविध भाग जोडणे, त्यातले सूक्ष्म दोष शोधणे इत्यादी एरवी अवघड वाटणारी कामे सहज संख्या होत आहेत. या प्रणालीमुळे मानवी मर्यादा ओलांडून गुणवत्तेत सुधारणा होते, उत्पादन खर्च कमी होतो, आणि उत्पादन जलद पूर्ण होते.

स्वयंचलित बाहने

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने तयार केलेली स्वयंचलित वाहने म्हणजे आपल्याला भविष्यातील सुरक्षित आणि सुखकर प्रवासाची झलक. आधुनिक तंत्रज्ञानाचा पूरक लाभ घेत पारंपरिक दिग्गजांना मागे टाकून टेस्ला, वायमो आदी तुलनेत नवीन कंपन्यांनी आपला ठसा उमटवला. अद्ययावत सेन्सर, कॅमेरे आणि लाइट डिटेक्शन अँड रेंजिंग प्रणाली वापरून वाहनांना आजूबाजूचे वातावरण समजून घेण्यास आणि योग्य निर्णय घेण्यास सक्षम करते. स्वयंचलित वाहने अपघातांची शक्यता कमी करत, प्रवास अधिक सुरक्षित बनवतात.

भविष्यवेधी देखभाल; मशीन लर्निंग, डेटा अॅनालिसीस

आयओटी इत्यादी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्रणाली वाहनांच्या भागांमधील संभाव्य दोष वेळेपूर्वी ओळखते. इंजिन, ब्रेक, टायर प्रेशर यांसारख्या घटकांचे निरीक्षण करून चालकाला वेळेवर सूचना देते. यामुळे मोठ्या दुरुस्तीचा खर्च आणि वेळ वाचतो, तसेच वाहनाची कार्यक्षमता आणि आयुष्य वाढते.

वैयक्तिकृत अनुभव

वाहनचालक आणि प्रवाशांसाठी त्यांच्या सोयीनुसार वैयक्तिकृत अनुभव देण्यास कृत्रिम बुद्धिमत्तेचा फार मोठा वाटा आहे. आसन व्यवस्था, तापमान, नेहमीचे मार्ग इत्यादी सवयी शिकून त्याप्रमाणे चालकास सूचना देणे इत्यादी कामे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रणालीद्वारे सहज केली जातात. याशिवाय, व्हाइस असिस्टेंटसारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून नकाशा, हवामान नियंत्रण आणि आवडते संगीत सुलभपणे नियंत्रित करता येते. हरित तंत्रज्ञानाचा समावेश इलेक्ट्रिक आणि हायब्रिड वाहनांच्या निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्ता महत्त्वाची भूमिका बजावते, कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्रणाली बॅटरी कार्यक्षमता सुधरवणे, चार्जिंगचे व्यवस्थापन करणे आणि ऊर्जा वापर अधिक चांगल्या प्रकारे नियोजित करणे. पर्यावरणपूरक, पण अधिक कार्यक्षम सामग्री तयार करण्यासाठीही कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग होतो. सर्वात महत्वाचे म्हणजे इंधनाचीदेखील बचत होते.

स्मार्ट ट्रॅफिक व्यवस्थापन

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने स्मार्ट सिटी तंत्रज्ञानाशी वाहनांचे समाकलन केले जाते. रिअल टाइम डेटा आणि अॅडॉप्टिव ट्रैफिक लाइट्सच्या मदतीने वाहतुकीचे नियोजन अधिक प्रभावीपणे करता येते. सेन्सर व सीसी टीव्ही कॅमेऱ्याचा वापर यामुळे वाहतूक कोंडी कमी होते आणि इंधन बचत होते. एकंदरीतच आधुनिक वाहन उद्योगासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे विकसित प्रणाली ही केवळ वाहनांची गुणवत्ताच सुधारत नाही, तर प्रवास अधिक सुरक्षित, सोयीस्कर आणि पर्यावरणपूरक बनवतो. त्यामुळे येणाऱ्या काळात या क्षेत्रात अजून काय काय चमत्कार बघायला मिळतील हे काळच ठरवेल.

वाढीव सुरक्षितता

मार्गिका निर्गमन चेतावणी (लेन डिपार्चर वॉर्निंग), स्वयंचलित आपत्कालीन गतिनिरोध सहाय्य (ऑटोनॉमस इमर्जन्सी ब्रेकिंग) आणि आवश्यकतेनुसार वेग नियंत्रण (अॅडॉप्टव्ह कुझ कंट्रोल) यासारख्या काही अत्यंत कार्यक्षम सुरक्षा प्रणालींमुळे चालकाला संभाव्य धोक्यांबद्दल वेळीच सावध केले जाऊ शकते. त्वरित प्रतिबंधात्मक पावले उचलली जाऊ शकतात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे घातक अपघात टाळता येऊ शकतात. चालकाच्या सोयीसाठी अंध- बिंदू नियंत्रण प्रणाली (ड्रायव्हर असिस्ट ब्लाइंड स्पॉट्स मॉनिटरिंग सिस्टिम) निरीक्षण करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करते, संभाव्य अडथळे जवळ असताना चालकाला चेतावणी देते. याची पुढची पायरी म्हणजे चालक नियंत्रण प्रणाली (ड्रायव्हर मॉनिटरिंग) याद्वारे चालकाला गाडी चालवताना कधी झोपी जाण्याचा धोका असू शकतो याचा अंदाज आधीच लावण्यास सक्षम आहे.