मल्टिवर्स – उत्कंठा वाढवणारा डूम

>> ड़ॉ स्ट्रेंज

जुन्या काळातील एक लोकप्रिय गेम म्हणजे डूम. त्यावर आधारित त्याच नावाचा चित्रपट 2005 साली प्रदर्शित करण्यात आला. डूम गेम तर लोकप्रिय होताच, पण sंsंइ या लोकप्रिय खेळात गाजत असलेला ‘द रॉक’ अर्थात ‘ड्वेन जॉन्सन’ या चित्रपटाचे प्रमुख आकर्षण होता. सायन्स-फिक्शन कथेला अॅक्शनची असलेली जोड या चित्रपटात चांगलीच गाजली.

काही वर्षांपासून सायन्स फिक्शनवर आधारित कॉम्प्युटर गेम्सनी तरुणाईला वेड लावले आहे. अशा काही गेम्सची लोकप्रियता इतकी वाढली की, त्यावर चित्रपटदेखील बनवले गेले आणि तेदेखील प्रचंड गाजले. जुन्या काळातील असाच एक लोकप्रिय गेम म्हणजे डूम. त्यावर आधारित त्याच नावाचा चित्रपट 2005 साली प्रदर्शित करण्यात आला. डूम गेम तर लोकप्रिय होताच, पण sंsंइ या लोकप्रिय खेळात गाजत असलेला ‘द रॉक’ अर्थात ‘ड्वेन जॉन्सन’ या चित्रपटाचे प्रमुख आकर्षण होता. सायन्स-फिक्शन कथेला अॅक्शनची असलेली जोड या चित्रपटात चांगलीच गाजली.

चित्रपटाची कथा सतत प्रेक्षकांना धक्के देणारी आणि मिनिटामिनिटाला उत्कंठा वाढवणारी आहे. पृथ्वीवर शास्त्रज्ञांना एका वॉर्महोल पोर्टलचा शोध लागलेला आहे. त्याला ते ‘द आर्क’ असे नाव देतात. या पोर्टलच्या माध्यमातून काही क्षणांत पृथ्वी ते मंगळ असा थेट प्रवास करणे मानवाला शक्य बनते. अमेरिका या पोर्टलच्या मदतीने मंगळावर एक भव्य अशी प्रयोगशाळा उभी करते. मंगळ ग्रहाचे वातावरण मानवाला राहण्यायोग्य बनवण्यासाठी तिथे मोठय़ा प्रमाणावर संशोधनाला सुरुवात होते. विविध शाखांमधील शास्त्रज्ञ या प्रयोगशाळेत आपले संशोधन कार्य सुरू करतात.

काही वर्षांनी या प्रयोगशाळेत कार्यरत असलेल्या एका मुख्य शास्त्रज्ञाकडून पृथ्वीवर एक धोक्याचा संदेश पाठवला जातो. प्रयोगशाळेतील सर्व शास्त्रज्ञांचा जीव धोक्यात असून एका अज्ञात शक्तीकडून प्रयोगशाळेवर हल्ला झाला असल्याचे या संदेशात सांगितलेले असते आणि तातडीने मदतीची मागणीदेखील केलेली असते. हा संदेश प्राप्त होताच द रॉक आणि त्याची धाडसी मरीन टीम मंगळाकडे रवाना होते. नेवाडा वाळवंटात असलेल्या पोर्टलच्या माध्यमातून ते थेट मंगळावरील प्रयोगशाळेत पोहोचतात. तिथे गेल्या गेल्या त्यांची भेट प्रयोगशाळेत कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱयाशी होते, ज्याचे कंबरेखालचे शरीर हे रोबोटिक अर्थात यांत्रिक असते.

वॉर्म होलमधून मंगळावर येत असताना एक छोटी चूक झाली आणि आपले अर्धे शरीर दुसऱया ग्रहावर फेकले गेले असे तो सांगतो आणि आपण कोणत्या धोक्यात प्रवेश केला आहे याची या टीमला पहिल्यांदा जाणीव होते.

प्रयोगशाळेवर हल्ला करणाऱयांचा शोध घेणे, त्यांचा विनाश करणे आणि प्रयोगशाळेत असलेल्या सर्व शास्त्रज्ञांना सुरक्षित करणे या मोहिमेला आता सुरुवात होते. रॉकचा साथीदार असलेल्या जॉनची बहीण सॅमदेखील त्याच प्रयोगशाळेत संशोधन करत असते. ती हट्टाने या टीमसोबत मोहिमेवर निघते. प्रयोगशाळेत असलेला डाटा सुरक्षित करण्यासाठी तिचा उपयोग होणार असतो. इथून पुढे चित्रपट प्रचंड वेग पकडतो आणि एकामागोमाग एक थरारक घटनांना सुरुवात होते.

प्रयोगशाळेच्या प्रत्येक भागाचे निरीक्षण करत असताना या टीमला एके ठिकाणी मानवी शरीराचे काही भाग आणि सांगाडे आढळतात. प्रयोगशाळेत नक्की कशाचे संशोधन चालू असते यावर आता या टीमला शंका येऊ लागते. बराच दबाव टाकल्यानंतर डॉ. सॅम त्यांना प्रयोगशाळेत नक्की कोणते संशोधन चालू होते याबद्दल माहिती देते. मानवाच्या शरीरात 23 ाढाsमोझोम असतात. जर मानवाच्या शरीरात 24 वा ाढाsमोझोम निर्माण केला तर त्याला सुपरपॉवर प्राप्त होतील असा शास्त्रज्ञांना विश्वास असतो आणि त्यासाठी त्यांनी एक प्रकारचे रसायन बनवलेले असते आणि त्याच्या मदतीने इथे मानवांवर प्रयोग केले जात असतात.
शास्त्रज्ञांनी बनवलेल्या रसायनांचा चुकीचा परिणाम झाल्याने अनेक मानवी जीव हे हिंस्र बनलेत, त्यांच्या शरीरातदेखील विकृत बदल झालेत आणि आता हेच जीव इथल्या शास्त्रज्ञांवर हल्ला करत आहेत हे थोडय़ाच वेळात स्पष्ट होते. त्यांनी ज्यांच्यावर हल्ला केला ते शास्त्रज्ञदेखील या विकृतीचा शिकार होत आहेत हेदेखील उघड होते. आता प्रयोगशाळेतील कोणतीही व्यक्ती अथवा वस्तू पोर्टलच्या माध्यमातून पृथ्वीवर पोहोचू नये ही एक नवी महत्त्वाची जबाबदारी या टीमवर पडते. अन्यथा मंगळावरचा धोका पृथ्वीवर पोहोचणार असतो. द रॉक आणि त्याची टीम या सर्व संकटाशी कशी झुंजते तो थरार पडद्यावर नक्की अनुभवा.