>> प्रेमसागर मेस्त्री
मंगोलियातील सिनेरियस गिधाडे, हिवाळ्यात तेथील इख नॉर्थ नेचर रिझर्व्ह या मिश्र गोबी वाळवंटातून भारतीय उपखंडात स्थलांतर करतात. त्यांच्या या स्थलांतराचा, प्रवास मार्गाचा शास्त्रीय अभ्यास करणारा संशोधन प्रकल्प अमेरिकेच्या डेन्व्हर झू या संस्थेने मंगोलियात उभारला आहे. या प्रकल्पासोबत काम करताना केलेले हे अभ्यास निरीक्षण.
मंगोलिया देशातील सिनेरियस गिधाडे, त्यांना भारतीय काळे गिधाड / भिक्षू गिधाड किंवा युरेशियन काळे गिधाड असेदेखील संबोधतात. तीन फूट अकरा इंच उंची असलेला आणि पंखाचा पसारा जवळपास नऊ ते दहा फूट इतका बलाढय़ असलेला हा पक्षी म्हणजे गिधाड प्रजातीतील सगळ्यात मोठे गिधाड म्हणून ओळखले जाते. मंगोलियातील इख नार्थ नेचर रिझर्व्ह या मिश्र गोबी वाळवंटातून ते हिवाळ्यात भारतीय उपखंडात स्थलांतर करतात. उणे 40 डिग्री इतके तापमान खाली घसरत असल्याने सगळीकडे बर्फाची चादर पसरते. खाद्य तुटवडा आणि बर्फाळ वातावरण यामुळे 14 किलो वजनाचे धूड सांभाळत ही गिधाडे उड्डाण करतात. उत्तर कोरिया आणि मग दक्षिण कोरिया असे जाऊन मग थायलंड उत्तर पर्वतीय प्रदेशांतून ते नेपाळकडे वळतात आणि भारतात प्रवेश करतात. त्याच्या या प्रवास मार्गाची माहिती घेण्यासाठी आणि शास्त्राrय अभ्यास करून त्याचे स्थलांतराचे थांबे, मार्ग, त्यामध्ये येणारे अडथळे अशा आशयाचा संशोधन प्रकल्प अमेरिकेच्या डेन्व्हर झू या संस्थेने मंगोलिया देशात उभारला.
मंगोलिया देश म्हणजे चीनच्या मध्य-उत्तर भाग आणि रशियाचा दक्षिण भाग यांच्या मधला देश. सिनेरियस गिधाड युरोपियन उपखंडातून अति धोक्यात आलेली गिधाडांची प्रजात म्हणून नोंदवली गेली आहे. या गिधाडांच्या संवर्धनासाठी डेन्व्हर झू या अमेरिकेतल्या संस्थेचे प्रकल्प अधिकारी, शास्त्रज्ञ डेव्हिड आणि रिचर्ड यांनी इख नार्थ नेचर रिझर्व्ह येथे गिधाड अभ्यास, संशोधन आणि संवर्धन केंद्र स्थापन केले आहे. या संशोधन केंद्रामध्ये अद्ययावत शास्त्राrय संशोधन साहित्य उपलब्ध करून दिले जाते. हा भाग गोबीच्या वाळवंटाचा भाग म्हणून प्रसिद्ध आहे. पुण्याच्या इला फाऊंडेशन संस्थेचे अध्यक्ष
डॉ. सतीश पांडे यांनी मला गिधाडांचा अभ्यास, संशोधन करण्यासाठी शास्त्रज्ञ रिचर्ड त्यांच्याकडे पाठविले. माझ्या आयुष्यातला पहिला लांब पल्ल्याचा विमान प्रवास मुंबईहून मी सुरू केला. साऊथ कोरिया येथे गेलो. तिथे रेडिओ ट्रान्समीटर बनवणाऱ्या कंपनीचे तांत्रिक माहिती तंत्रज्ञान पुरवठा अधिकारी किम आणि हान यांच्या सोबत मंगोलिया हा प्रवास झाला.
साऊथ कोरिया येथील उत्तर भागाच्या टेकड्यांमध्ये जिथे गिधाडे स्थलांतर करत असताना काही काळ थांबतात अशा प्रदेशात आम्ही सर्वेक्षण करून आलो. पक्ष्यांच्या निरीक्षणासाठी खास येथे लाकडी निरीक्षण थांबे बांधले आहेत. या थांब्यांवरून निरीक्षण करत त्यांची मोजदाद करता येते. काही सिनेरियस गिधाडे ही मंगोलियातून थेट कोरिया असा 2147 किलोमीटरचा प्रवास करतात. काही गिधाडे चार ते सात दिवसांत कोरिया येथे पोहोचतात. तिथे एक ते दीड महिना राहतात आणि पुन्हा मंगोलियाकडे वळतात, तर काही गिधाडे पूर्व रशियाकडे अगदी थेट उत्तर सायबेरियाच्या भागात याकुथस्क येथे थेट 2742 किलोमीटरचा प्रवास करून जातात, पण खरं तर त्यांचे असे उत्तर सायबेरियातील स्थलांतर हे वातावरण बदलाला साजेसे नसावे म्हणून पुन्हा ते मंगोलियाकडे वळतात, तर काही गिधाडे मंगोलियातून नेपाळकडे थेट स्थलांतर करताना दिसतात.
2006 पासून ते 2016 पर्यंतच्या दहा वर्षांच्या सातत्याने केलेल्या संशोधनातून त्या काळी डेव्हिड आणि रिचर्ड या दोन शास्त्रज्ञांनी हे मार्ग निश्चित केले. तरीदेखील गिधाडांची संख्या झपाट्याने युरोपियन उपखंडात कमी होत असल्याच्या नोंदी चिंताग्रस्त करणाऱ्या आहेत. भारतामध्ये ही गिधाडे येण्याचे प्रमाण अधिक आहे. हा झाला मध्य आणि पूर्वेकडील आशियाई भागातला गिधाडांच्या स्थलांतराचा मार्ग, पण पश्चिमेकडील स्पेन, पोर्तुगाल आदी भागांतून निघणारी गिधाडे ही कझाकिस्तान, इस्रायल, मध्य आखाती देश, पाकिस्तान आदी मार्गाकडे पसरतात, तर काही थेट स्पेनमधून उत्तर आफ्रिकेतील मोरोक्को देशात आणि तिथून पुन्हा मध्य आफ्रिकेपर्यंत प्रवास करतात. पश्चिमेकडील गिधाडांना पूर्व युरोपकडे जाऊन हिमालयाची मोठी रांग ओलांडून भारतात येण्यापेक्षा इस्रायलमार्गे आफ्रिकेला जाणे जास्त सोयिस्कर असते. दोन्ही गिधाडांच्या जनुकीय माहितीनुसार पारंपरिक पद्धतीचे हे स्थलांतर त्यांच्या पिढ्यान्पिढ्या स्थलांतरिदण मध्य भागात ताशातान जिह्याच्या दक्षिणेकडील वाळवंटी प्रदेशात इगोर आणि एलोवेरा या शिकारी पक्षीगण संशोधन टीमबरोबर दोन वर्षे शिकारी पक्षी शास्त्राrय सर्वेक्षण मोहिमेत सहभागी होतो.
दक्षिण रशियाचा हा भाग उत्तर मंगोलियाच्या गोबी वाळवंटाला लागून आहे. त्यामुळे जनुकीय नमुन्यानुसार ही सिनेरियस गिधाडे मंगोलिया देशातील गिधाडांचे भाऊबंद आहेत. भारतातील त्यांचे मार्ग म्हणजे उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, दक्षिण भारत आदी ठिकाणी बघायला मिळतात, तर राजस्थान, गुजरातकडे आणि उत्तर प्रदेशातील रेवा, पन्ना आणि पेंच आदी भागांत दोन ते अडीच महिने त्यांचे वास्तव्य असते. स्थलांतराच्या या प्रक्रियेमध्ये अनेक वेळा त्यांना उपासमारीला सामोरे जावे लागते. वातावरणीय बदलामुळे वेळी अवेळी येणाऱ्या वादळामुळेदेखील त्यांचे मार्ग बदलतात आणि अधिक ऊर्जा खर्च झाल्यामुळे त्यांना उपासमारीला सामोरे जावे लागते. भारतामध्ये गेल्या दोनहून अधिक दशकांत ग्राम स्वच्छता अभियानामुळे गावोगावी मेलेली गुरे पुरण्याचे आदेश शासनाकडून जाहीर करण्यात आले. त्यामुळे अनेक गावांतून मृत जनावरे जमिनीमध्ये गाडली गेली. त्यामुळे गिधाडांना खाद्य मिळेनासे झाले, तर काही ठिकाणी मोठे दहनगृह कचरा पेटीच्या इथे उपलब्ध असल्यामुळे मृत जनावरांचे दहन करून विल्हेवाट लावली जाते. त्यामुळे गिधाडांना मृत खाद्य भेटण्याचे प्रमाण भरपूर कमी झाले आहे. तसेच जोधपूर, बिकानेर नवलगढ, जैसलमेर, हरिद्वार, ऋषीकेश, पौंता साहीब आदी भागातील कचरा, डोंगराच्या ढिगात प्लास्टिकचे प्रदूषित खाद्य गिधाडांसाठी धोकादायक ठरत आहे.
जिथे गिधाडे आणि इतर शिकारी पक्षीगण स्थलांतराचे द्राविडी प्राणायाम करून येतात ते थांबे निश्चित करणे महत्त्वाचे आहे. शास्त्रीय परिसंस्था आणि परिसरातील उपलब्ध संसाधने बघून ती सुधारित करणे काळाची गरज आहे. इतका 4000 किमीपेक्षा जास्त प्रवास करून येणारी पक्ष्यांची पंढरी जनता त्यांचे सोबती जेव्हा त्यांच्या पारंपरिक मार्गे नियोजित ठिकाणी पोहोचतात तेव्हा त्यांच्या शरीरात कमालीचा फरक होतो. शरीर थकते, वजन कमी होते, डिहायड्रेशन अशा अनेकविध समस्यांना सामोरे जावे लागते. त्यांना इतका प्रवास करून आल्यावर छान प्लास्टिकरहित डंपिंग ग्राऊंड उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आपलीच आहे, अन्यथा काही वर्षांत हे पक्षी नामशेष होताना दिसतील.
(लेखक रायगड जिल्हा, मानद वन्यजीव रक्षक आहेत.)