लेख – धोकादायक वैद्यकीय कचरा

>> सूर्यकांत पाठक

आरोग्य सेवेत वापरल्या जाणाऱया उपकरणांपासून तयार होणारा कचरा हा उपचार आणि निर्मूलनाच्या वेळी पर्यावरणात विषाणूंचा प्रसार करणे तसेच विषाक्त पदार्थ सोडत असल्याने अप्रत्यक्षपणे मानवी आरोग्य संकटात सापडते. योग्य रीतीने त्याची विल्हेवाट न लावल्याने किंवा योग्य रीत्या निर्जंतुकीकरण न केल्याने भविष्यात पाणी, पृष्ठभाग, भूजल यात प्रदूषण होऊ शकते. म्हणूनच वैद्यकीय कचरा कमीत कमी निर्माण व्हावा यासाठी प्राधान्य देणे गरजेचे आहे. परिणामी एकतर कचऱयाचे प्रमाण कमी होईल आणि त्याची हाताळणी करणे, विल्हेवाट लावणे सोयीचे होऊ शकते.

आरोग्य सेवा ही मानवी आरोग्य जपण्याचे आणि देखभाल करण्याचे काम करते. तसेच जीव वाचविण्याचे काम करते. मात्र त्यापासून निर्माण होणाऱया वैद्यकीय कचऱयाचे काय? आरोग्य सेवेत वापरली जाणारी शेकडो टन प्लॅस्टिकची उपकरणे आणि साधनांतून निर्माण होणाऱया कचऱयापैकी 85 टक्के कचरा सामान्य आणि धोकादायक नसतो आणि तो घरातील कचऱयाप्रमाणेच सामान्य असतो, पण उर्वरित पंधरा टक्के कचरा हा धोकादायक मानला जातो. या कचऱयामुळे वातावरण दूषित होऊ शकते. संसर्गजन्य, रासायनिक आणि रेडिएशनचा धोका राहतो. आरोग्य सेवेत वापरण्यात येणाऱया वैद्यकीय साधनांच्या कचऱयाचे सुरक्षितपणे निराकरण करण्यासाठी आणि पर्यावरणपूरक विल्हेवाट लावण्यासाठी योग्य व्यवस्थापनाच्या आधारे उपाय केले तर आरोग्यावर आणि पर्यावरणावर होणारे संभाव्य विपरीत परिणाम रोखता येऊ शकतात. यात वैद्यकीय कचऱयात रासायनिक आणि अनपेक्षित उत्सर्जनाचा समावेश असतो.

आरोग्य सेवेतील वैद्यकीय कचऱयामुळे निर्माण होणाऱया संभाव्य धोक्यात तीक्ष्ण वस्तूंनी होणाऱया जखमांचादेखील समावेश आहे. आरोग्य सेवेतील कचऱयाचे व्यवस्थापन किंवा त्याचे निर्मूलन करताना परिसरात सोडण्यात येणारी औषधी प्रामुख्याने अँटिबायोटिक्स आणि सायटीटॉक्सिक औषधे तसेच पारा किंवा डायऑक्सिनसारख्या घटकांच्या संपका&त येणे, विषाणू संशोधन, लसीकरण किंवा कचऱयावर प्रयोग करताना त्यापासून निर्माण होणारे रासायनिक उत्सर्जन, आरोग्य उपकरणांचे निर्मूलन करताना हवेत कण मिसळल्याने होणारे हवेतील प्रदूषण, मोकळ्या आकाशात जाळण्यात येणारी निरुपयोगी उपकरणे तसेच वैद्यकीय साधनांचा बेकायदा साठा, उपचार अणि निर्मूलनासाठी वापरण्यात येणाऱया विषाणूविरोधी घटकांचा प्रसार, अपुरी आरोग्य सेवा यांसारखे असंख्य घटक वैद्यकीय कचऱयाला हातभार लावतात. यातही मर्यादित कायद्याची चौकट (धोरण, नियमावली, दिशानिर्देश), आरोग्य सेवेने निर्माण होणाऱया वैद्यकीय कचऱयाबाबत जनजागृती नसणे, कचऱयाचे व्यवस्थापन योग्य रीत्या न होणे, मनुष्यबळाचा अभाव, कचरा व्यवस्थापनाला महत्त्व न देणे यांसारख्या गोष्टीदेखील वैद्यकीय कचऱयाला मदत करतात. अनेक देशांत तर योग्य नियमदेखील नाहीत किंवा त्यावर देखरेख किंवा पाहणी करणारी वेगळी नियामक संस्थादेखील नाही. जगभरात दरवर्षी अंदाजे 16 अब्ज इंजेक्शन दिले जातात. तुलनेने सुई आणि सीरिंज यांचा सुरक्षितरीत्या निपटारा केला जात नाही. म्हणून जखम होण्याचा आणि संसर्गाची जोखीम अधिक होण्याचा किंवा त्याचा पुनर्वापर करण्याचा धोका निर्माण होतो. अलीकडच्या काळात निम्न आणि मध्यम उत्पन्न गटातील देशांत कालबाह्य सुई आणि सीरिंजच्या वापरावर निर्बंध आणल्याने लसीकरणाचे प्रमाण कमी झाले. म्हणजेच काही प्रमाणात इंजेक्शन उपकरणांचा पुन्हा वापर करण्यावर बंदी घालण्यात आली होती. अशा प्रकारे जनजागृती केली जात असतानाही असुरक्षित मार्गाने इंजेक्शन अजूनही दिले जात आहेत. परिणामी जगभरात 33,800 जण नवीन एचआयव्हीबाधित, 1.7 दशलक्ष हेपेटायटिस बी संसर्गबाधित आणि 315,000 जण हेपेटायटिस सी संसर्गबाधित होण्यास कारणीभूत ठरले. कचरा डेपोच्या ठिकाणी साफसफाई करताना तसेच आरोग्य सुविधेच्या दृष्टीने धोकादायक असणाऱया कचऱयाची हाताळणी करताना तसेच मानवी रूपातून त्याचे विच्छेदन करण्याच्या कृतीने अनेक आरोग्यविषयक समस्या निर्माण होतात. या गोष्टी जगभरात अनेक ठिकाणी सर्रास घडतात. प्रामुख्याने निम्न आणि मध्यम उत्पन्न गटातील देशांत. सुईचा निपटारा करताना त्यापासून जखम होणे, विषाणू पसरणे यांसारख्या गोष्टी होण्याचा अधिक धोका राहतो.

आरोग्य सेवेत वापरल्या जाणाऱया उपकरणांपासून तयार होणारा कचरा हा उपचार आणि निर्मूलनाच्या वेळी पर्यावरणात विषाणूंचा प्रसार करणे तसेच विषाक्त पदार्थ सोडत असल्याने अप्रत्यक्षपणे मानवी आरोग्य संकटात सापडते. योग्य रीतीने त्याची विल्हेवाट न लावल्याने किंवा योग्य रीत्या निर्जंतुकीकरण न केल्याने भविष्यात पाणी, पृष्ठभाग, भूजल यात प्रदूषण हेऊ शकते. म्हणूनच वैद्यकीय कचरा कमीत कमी निर्माण व्हावा यासाठी प्राधान्य देणे गरजेचे आहे. परिणामी एकतर कचऱयाचे प्रमाण कमी होईल आणि त्याची हाताळणी करण्यात आणि विल्हेवाट लावणे सोयीचे जाऊ शकते. कचरा किमान पातळीवर आणण्यासाठी पर्यावरणपूरक खरेदी करणे, त्याची कमीत कमी वाहतूक करणे, पर्यावरणपूरक पॅकेजिंग करणे, सुरक्षित अणि व्यवहारिक पातळीवर वापर केल्यानंतर त्याच्यावर पुनर्पक्रिया करून अन्य ठिकाणी त्याचा वापर करणे यांसारख्या गोष्टींवर भर दिला पाहिजे.

आरोग्य सेवेतील कचऱयावर चुकीच्या पद्धतीने प्रक्रिया केल्यास पर्यावरणावर विपरीत परिणाम होऊ शकतात आणि धोकादायक रासायनिक घटक बाहेर पडू शकतात. या वस्तूंना पर्यावरणानुसार हाताळले नाही, साठवणूक केली नाही तर त्यावर मार्ग काढता येणार नाही. वैद्यकीय उपकरणांपासून निर्माण होणाऱया कचऱयासाठी सर्वसमावेशक आणि दीर्घकालीन सुधारणा योजना राबविणे गरजेचे असून त्यासाठी सरकारने बांधीलकी जोपासणे आणि पाठिंबा देणे गरजेचे आहे. अर्थात स्थानिक पातळीवर त्यावर तात्काळ मार्ग काढला जाऊ शकतो.

(लेखक ग्राहक पंचायत समितीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत.)