>> शिवानी गोंडाळ (मेकअप आर्टिस्ट)
अनेक वेळा हेअर स्टाईल करत असताना केलेली हेअर स्टाईल नीटनेटकी आणि चांगली दिसावी यासाठी ‘ब्लोड्राय’चा वापर करतात. ब्लोड्राय हे टेक्निक असून ते नीट वापरले तर केस छान दिसण्यास मदत होते. ब्लोड्रायमुळे केस दाट असल्यासारखे वाटतात तसेच ते सिल्की आणि चमकदार दिसण्यासही मदत होते. ब्लोड्राय केल्यामुळे केसांना व्हॅल्यूम मिळतो आणि केस स्ट्रेट होतात. केसांवर बारीक बारीक केस असतात ते म्हणजेच प्रिंजी हेअर आपण ब्लोड्राय केल्यामुळे लपून जातात व आपली हेअर स्टाईल नीट दिसण्यास मदत होते.
पूर्वी हेअर स्टाईल करताना ब्लोड्रायचा फार वापर केला जात नसे, मात्र अलीकडे ट्रेंड जसजसा बदलत गेला तसतसे हेअर स्टाईल करण्याच्या अगोदर काही गोष्टी करणे गरजेचे झाले. हेअर स्टाईलसाठी ब्लोड्राय वापरताना साधारण 2200 ते 2500 वॉटचा ब्लोड्राय वापरणे गरजेचे असते. ब्लोड्राय करताना प्रथम तुम्हाला हेअर वॉश करावा लागतो किंवा तुम्ही केस थोडेसे ओले करून घेतल्यानंतर ते टॉवेलने सुकवावे. त्यावर प्रीस्टायलिंग प्रोडक्ट म्हणजे हेअर सिरम, मूस, हीट प्रोटेक्टर स्प्रे यांचा वापर करू शकता. यामुळे तुमच्या केसांचे गरम वाफेपासून संरक्षण होण्यास मदत होईल आणि मग ब्लास्ट ड्राय करून घ्या. अशामुळे केसांना एकप्रकारे व्हॅल्यूम येईल. बऱयाच वेळा क्लाइंटला ज्या प्रकारे गरज असते त्याप्रमाणे आपल्याला ब्लोड्राय करण्याची आवश्यकता पडते. जसे की जर केस मोकळे सोडायचे असतील तर आपल्याला इनवर्ड किंवा आऊट वर्ड असा ब्लोड्राय करावा लागतो किंवा एखादी हेअर स्टाईल करायची असेल तर आपल्याला स्ट्रेट ब्लोड्राय करावा लागतो.
कसे कराल…
– ब्लोड्राय करताना आपल्याला प्रथम केसांचे सेक्शन करून घ्यावे लागतात. प्रत्येक सेक्शनला ब्लोड्राय करावे लागते. एकावेळी एका सेक्शनवरच काम करावे व बाकीचे केस क्रोकोडाइल क्लिपने बांधून ठेवावेत. तुम्ही जर स्टेट ब्लोड्राय करणार असाल तर तुम्ही फ्लॅट ब्रश वापर करू शकता.
– खालच्या बाजूने प्रथम ब्लोड्राय करून मग हळूहळू मध्यावर जाऊन नंतर वरच्या बाजूला जावे लागते. असे प्रथम तुम्ही खालच्या बाजूने केल्यानंतर एकदा राईट साईट व एकदा लेफ्ट साईड अशा दोन्ही बाजूनेही तुम्हाला ब्लोड्राय करावे लागते. डोक्याच्या वरच्या बाजूला असलेले केस ब्रशने थोडे वर करून घ्यावेत. त्यामुळे केसांचा हॉल्युम जास्त असल्यासारखा वाटेल व केस छान बाऊंसी दिसतील तसेच टाळूवर जपून ब्लोड्राय करावे. ज्यामुळे टाळूच्या त्वचेला कोणतेही हानी पोहोचणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. अशाप्रकारे सगळय़ा केसांना तुम्ही ब्लोड्राय केल्यामुळे तुमच्या केसांना एकप्रकारे व्हॉल्युम मिळेल व तुम्हाला हेअर स्टाईल करणे अगदी सोपे जाईल.