साय-फाय : MNGL – सायबर चोरटय़ांचा नवा खेळ

प्रसाद ताम्हनकर

मुंबई, पुणे यांसारख्या मोठय़ा शहरांसह इतरही अनेक लहानमोठय़ा शहरांना सध्या सायबर चोरटय़ांनी महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडचे (MNGL) नाव वापरून फसवायला सुरुवात केली आहे. सुशिक्षित लोकदेखील या फसवणुकीला बळी पडत असून आपले लाखो रुपये गमावत आहेत. सिलिंडर वापरणारे लोक अजूनही पाइपलाइनने मिळणाऱया गॅसला म्हणावे तसे सरावलेले नाहीत. सिलिंडरवाला आला की, त्याला कार्ड द्यायचे, पावती बघायची आणि सिलिंडरचे पेमेंट करायचे अशा साध्यासोप्या मार्गाला आपण सरावलेले लोक आहोत. मात्र नव्या पाइपलाइन गॅसचे बिल आणि त्याचे पेमेंट यांचा अजूनही लोकांना नीटसा अंदाज न आल्याने ते सहजपणे या सायबर चोरटय़ांच्या जाळ्यात अडकले जात आहेत.

सायबर चोरटे तीन मार्गांनी MNGL च्या ग्राहकांची फसवणूक करत आहेत. पहिला मार्ग म्हणजे ईमेलच्या माध्यमातून संपर्क साधणे, दुसरा मार्ग व्हॉट्सअॅप अथवा इतर मेसेजिंग अॅपच्या माध्यमातून मेसेज पाठवणे आणि तिसरा मार्ग म्हणजे फोनवर कॉल करून संवाद साधणे. एकदा का ग्राहकाशी संपर्क साधला गेला की, त्याचे नाव, ईमेल आयडी, MNGL शी जोडलेला मोबाइल नंबर, त्याचा ग्राहक नंबर अशी सर्व माहिती योग्य प्रकारे देऊन ग्राहकांचा विश्वास संपादन केला जातो. फक्त ग्राहक अथवा MNGL कडे असलेली ही वैयक्तिक माहिती समोरच्या व्यक्तीने खडाखडा सांगितली की, ती व्यक्ती MNGL कडूनच बोलते आहे यावर सामान्य ग्राहकाचा सहज विश्वास बसतो.

ग्राहकांचा विश्वास संपादन झाला की, त्याला MNGL च्या वेबसाइटमध्येमध्ये काही तांत्रिक बदल झाल्याने तुमचे अकाऊंट पुन्हा अपडेट करावे लागणार आहे किंवा तुमचे गेल्या महिन्याचे बिल थकलेले आहे. त्यामुळे तुमचे गॅस कनेक्शन आज रात्री बंद होणार आहे अशा प्रकारची खोटी कारणे सांगून घाबरवले जाते. त्यानंतर ग्राहकांच्या बँक खात्याची अथवा ाsढडिट कार्डची पूर्ण माहिती घेतली जाते आणि त्याआधारे त्यांच्या खात्यातून पैसे लंपास केले जातात. बऱयाचदा ग्राहकांना एखादी लिंक पाठवून त्यावर क्लिक करायला सांगितले जाते अथवा एखादे रिमोट अॅप डाऊनलोड करायला सांगून हे सायबर चोरटे ग्राहकांच्या संगणक अथवा मोबाइलचे पूर्ण नियंत्रण मिळवतात आणि त्याद्वारे ग्राहकांची फसवणूक केली जाते.

महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडनेदेखील आता अशा फसवणुकीच्या प्रकारांची दखल घेतली असून ग्राहकांना जागरूक राहण्याची विनंती केली आहे. यासंदर्भात MNGL तर्फे पोलिसांकडे पारदेखील नोंदवण्यात आली आहे. पोलीसदेखील MNGLच्या ग्राहकांशी ज्या मोबाइल ाढमांकाद्वारे अथवा ईमेलद्वारे संपर्क साधला गेला त्यांचा मागोवा घेत आहेत. अत्यंत शिताफीने केल्या जाणाऱया या फसवणुकीला आळा घालण्यासाठी आता पोलीस दलाने कंबर कसली आहे.

तपास यंत्रणा आपले काम करत असल्या तरी ग्राहकांनीदेखील सावध राहण्याची आणि काळजी बाळगण्याची गरज आहे. MNGL असो अथवा महावितरण, पुणे महानगरपालिका अशी कोणतीही सरकारी संस्था किंवा त्यांचे कर्मचारी तुमच्या बँक खात्याचा अथवा ाsढडिट कार्डचा तपशील मागत नाहीत. सरकारी संस्थांसोबत अनेकदा मोबाइल कंपनी अथवा तुमच्या बँकेचा कर्मचारी बोलतो आहे असे भासवून तुमची वैयक्तिक माहिती, बँक खात्याचा तपशील जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो. अशा वेळी वेळीच सावधगिरी बाळगावी आणि अशी गोपनीय माहिती कोणत्याही व्यक्तीशी शेअर करू नये. MNGL च्या नावाखाली केल्या जात असलेल्या फसवणुकीमध्ये काही ग्राहकांना अवघे पाच-सात रुपये थकीत बिलाची रक्कम म्हणून भरण्यास सांगण्यात आले होते. त्यामुळे त्यांचा चटकन विश्वास बसला आणि त्यांना पाठवण्यात आलेल्या पेमेंट लिंकवर क्लिक करून त्यांनी पेमेंट केलेदेखील. मात्र त्याचा फायदा घेत त्यांच्या बँक खात्याची पूर्ण माहिती मिळवून सायबर चोरटय़ांनी त्यांना लाखोंना गंडा घातला आहे. त्यामुळे असा कोणताही कॉल अथवा मेसेज मिळाल्यास गडबडून न जाता त्या सरकारी संस्थेच्या अधिकृत फोन नंबर अथवा ईमेलवर संपर्क साधावा आणि योग्य माहिती प्राप्त करावी.