>> प्रसाद पाटील
हमासचा म्होरक्या इस्माईल हानियाची तेहरानमध्ये हत्या झाली आणि त्यानंतर याह्या इब्राहिम हसन सिनवारवर याच्याकडे हमासच्या प्रमुखपदाची जबाबदारी सोपविली आहे. गेल्या वर्षी 7 ऑक्टोबरच्या इस्रायलवरील हल्ल्याचा मुख्य मास्टरमाइंड म्हणून सिनवारला ओळखले जाते. याह्या सिनवार हमासच्या भुयारात लपून बसला आहे. सिनवार हा कुख्यात आणि क्रूरकर्मा म्हणून मानला जातो. त्याला पॅलेस्टिनींचा लादेन म्हटले जाते. त्याच्या क्रौर्याच्या कहाण्या थरकाप उडविणाऱया आहेत.
हमासचा म्होरक्या इस्माईल हानियाची तेहरानमध्ये हत्या झाली आणि आखातामध्ये भीषण युद्धाचा तणाव निर्माण झाला. हानिया याच्यानंतर हमासने याह्या इब्राहिम हसन सिनवारवर प्रमुखपदाची जबाबदारी सोपविली आहे. सिनवारला पॉलिटिकल विंगचा नवीन प्रमुख नेता म्हणून हमासने नियुक्त केले. सिनवार हा क्रूरकर्मा म्हणून ओळखला जातो. 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवरील हल्ल्याचा मुख्य मास्टरमाइंड म्हणून सिनवारला ओळखले जाते. या हल्ल्यात 1200 हून अधिक इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला अणि सुमारे 250 जण ओलीस ठेवले. याह्या सिनवारने या हत्याकांडाचे कारस्थान आखल्याचे इस्रायलचे अधिकारी सांगतात. तो हमासच्या भुयारात लपून बसला आहे. अधिकाऱ्यांच्या मते, सिनवार हा खान युनिस शहर किंवा राफा येथील भुयारात लपून बसला आहे. ऑक्टोबरच्या हल्ल्यानंतर ‘आयडीएफ’ने (इस्रायल डिफेन्स एजन्सी) याह्या सिनवारला कुख्यात शत्रू म्हणून घोषित केले. इस्रायलने त्याला मारण्यासाठी अनेक मोहिमा आखल्या. ‘आयडीएफ’ने फेब्रुवारीत एक व्हिडीओ जारी केला. त्यात 10 ऑक्टोबर रोजी याह्या सिनवार हा आपल्या कुटुंबासह गाझातील भुयारातून जाताना दिसला होता. हमासने हानियाची पोकळी भरून काढण्यासाठी सिनवारची नियुक्ती केली आणि त्याच्यावर मोठी जबाबदारी सोपविली असल्याचे जाहीर केले.
सिनवारचा जन्म 1962 मध्ये दक्षिण गाझातील खान युनिस शहरातील निर्वासितांच्या शिबिरात झाला. हमासची स्थापना 1987 मध्ये झाली अणि तेव्हापासून सिनवार हा या संघटनेत काम करत आहे. विशेष म्हणजे त्याच वर्षी इस्रायलने त्याला अटक केली आणि जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्याच्यावर इस्रायलच्या दोन सैनिकांची हत्या करणे आणि चार पॅलेस्टिनी नागरिकांचे अपहरण केल्याचे आरोप केले होते. तो इस्रायलच्या तुरुंगात सुमारे 23 वर्षे कैदेत राहिला. 2011 मध्ये त्याची मुक्तता झाली. इस्रायली सैनिक गिलाद शालिदच्या मुक्ततेच्या बदल्यात त्याला सोडून देण्यात आले. 2012 मध्ये सिनवारला हमासच्या राजनैतिक ब्युरोत निवडले गेले आणि त्याच्यावर कस्साम ब्रिगेडच्या समन्वयाची जबाबदारी सोपविली. आता पॉलिटिकल विंगच्या प्रमुखपदी नेमताना त्याच्यावर मोठी जबाबदारी सोपविली आहे.
सिनवारला पॅलेस्टिनींचा ओसामा बिन लादेन असेही म्हटले जाते. त्याच्या क्रौर्याच्या कहाण्या थरकाप उडविणाऱया आहेत. इस्रायलसाठी हेरगिरी केल्याच्या संशयावरून त्याने एका व्यक्तीला त्याच्या भावामार्फत जिवंत गाडले होते. 2015 मध्ये त्याच्या आदेशावरून हमासच्या एका कमांडरचा अनन्वित छळ करून त्याची हत्या करण्यात आली. इस्रायलला मदत करणाऱया कोणत्याच पॅलेस्टिनी नागरिकाला तो जिवंत सोडत नाही, असे त्याच्याबद्दल बोलले जाते. कोणत्याही पुराव्याची खातरजमा न करता तो संबंधित व्यक्तीचा जीव घेतो. याह्याने अनेक पॅलेस्टिनी नागरिकांची हत्या केली आहे. एखाद्याने सिनवारचे म्हणणे ऐकले नाही तर त्याचे आयुष्य संपविले गेले आहे. त्याला खान युनिस शहराचा जल्लाद असेही म्हटले जाते. अमेरिकेने 2015 मध्ये सिनवारला दहशतवादी म्हणून घोषित केले. इस्रायल, अमेरिकेने त्याच्याविरोधात अनेक मोहिमा आखल्या, तर दुसरीकडे हमासमधील त्याचे स्थान आणखीच बळकट होत गेले. 2017 मध्ये सिनवारला हमासच्या पॉलिटब्युरोचे सदस्य केले.
गाझामध्ये लपलेला 61 वर्षीय सिनवार हा इस्रायलच्या रडारवर आहे. इस्रायलने त्याच्यावर 4 लाख डॉलरचे बक्षीस ठेवले आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे माजी अधिकारी स्टीफन गनयार्ड म्हणतात, इस्रायलच्या प्रत्येक नागरिकाची सिनवार पकडला जावा अशी इच्छा आहे आणि ते कधी ना कधी पकडतीलच. गाझाखालील एका भुयारात तो लपून बसला आहे आणि तेथे नरसंहाराचे कारस्थान रचले जात आहे.
13 जुलैच्या दक्षिण गाझा शहर खान युनिस येथे एका हल्ल्यात हमासचा कमांडर मोहंमद डेफ मारला गेला. डेफ आणि सिनवार हे 7 ऑक्टोबरच्या हल्ल्याचे मास्टरमाइंड होते. ‘आयडीएफ’च्या अधिकाऱ्यांनी म्हटले, बैरूत येथे एका क्षेपणास्त्र हल्ल्यात हिजबुल्लाह सैनिक कमांडर फुहाद शुकरला ठार केले. तो उत्तर इस्रायलवर ड्रोन आणि रॉकेट हल्ल्याची तयारी करत असल्याचा दावा इस्रायलच्या अधिकाऱ्यांनी केला आणि त्यानुसार कारवाई केली. शुकरच्या कारस्थानात इस्रायलच्या अधिपत्याखालील गोलान हाईट्स येथील एका हल्ल्याचा समावेश असून त्यात फुटबॉल खेळणाऱया 12 मुलांचा आणि तरुणांचा मृत्यू झाला. गनयार्डने म्हटले, हमासच्या नेत्यांची हत्या पाहता भविष्यकाळात हमासबाबत निर्णय घेण्याची जबाबदारी सिनवारवर सोपविली गेल्याचे स्पष्ट होते. त्याच वेळी व्हाईट हाऊसशी गाझातील शस्त्रसंधी आणि इस्रायलच्या ओलिसांसंदर्भात चर्चा सुरू आहे.
याह्या सिनवारचा जन्म 1962 मध्ये खान युनिस शहरात झाला. 1980 च्या दशकाच्या प्रारंभी गाझा येथे इस्लामिक विद्यापीठात अधिपत्याविरोधात नेहमीच चळवळी होत असे. या चळवळीत सहभाग घेतल्याने सिनवारला अनेकदा अटकही झालेली आहे. पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सिनवारने एक पथक तयार केले अणि त्यांना इस्रायलच्या विरोधात सशस्त्र प्रतिकार करण्याचे प्रशिक्षण दिले. त्यानंतर हा गट कस्साम ब्रिगेड म्हणून ओळखला जाऊ लागला आणि ती एक हमासची सैन्य शाखा आहे. 1987 मध्ये शेख अहमदी यासीनने हमासची स्थापना केल्यानंतर सिनवार हा प्रमुख नेत्यांपैकी एक झाला. एक वर्षानंतर इस्रायलने त्याला अटक केली आणि त्याला चार वेळा जन्मठेप भोगण्याची शिक्षा दिली. म्हणजे 426 वर्षांची जन्मठेप. त्याच्यावर हत्येचा आरोप होता. त्याने 23 वर्षे तुरुंगात काढली. सिनवारने हिबरू भाषा शिकली अणि इस्रायलच्या राजकीय व्यवहाराचे चांगले आकलन केले. 2011 मध्ये एका कैद्याच्या बदल्यात त्याची सुटका करण्यात आली.
शिक्षा भोगून बाहेर आल्यावर सिनवारला हमासमधील त्याचे वर्चस्व वाढल्याचे जाणवले. त्याला 2012 मध्ये राजनैतिक ब्युरो म्हणून निवडले गेले. कुस्साम ब्रिगेडशी समन्वय साधण्याची जबाबदारी दिली. इस्रायलने 2014 मध्ये हमासच्या विरोधात सात आठवडे हल्ले केले, तेव्हा सिनवारने एक प्रमुख राजनैतिक आणि सैन्याची भूमिका वठविली. पुढच्या वर्षी अमेरिकेने त्याच्यावर जागतिक दहशतवादी म्हणून लेबल लावले. सिनवारने डिसेंबर 2022 मध्ये एक धक्कादायक घोषणा केली. त्यानुसार त्याने इस्रायलच्या विरोधात लढाऊ विमाने अणि रॉकेटची फळी उभारण्याची धमकी दिली. तो म्हणाला, ‘‘आम्ही तुमच्याकडे येऊ तेही देवाच्या इच्छेनुसार आणि प्रचंड शस्त्रसाठय़ासह. आमच्याकडे रॉकेटचा ताफा असून आम्ही सैनिकांच्या टोळींसह येऊ. आम्ही तुमच्याकडे लाखो लोकांसह येऊ, जसे समुद्रात उसळणाऱया लाटा.’’ त्यामुळे येणाऱया काळात सिनवारकडून इस्रायलवर याहून भीषण घणाघाती हल्ला केला जाण्याची दाट शक्यता दिसत आहे.