>> ब्रिगेडियर हेमंत महाजन
युक्रेनला दारूगोळा आयात करण्याकरिता वेगवेगळय़ा देशांकडून मदत घ्यावी लागते आणि यामध्येच युरोपमधल्या काही पंपन्या भारतातून तोफगोळ्यांचे शेल केसिंग आयात करून युरोपमध्ये त्यामध्ये स्पह्टके भरून ते युव्रेनला विकत आहेत. म्हणजेच भारताचा दारूगोळा युव्रेनकडे डायरेक्ट जात नाही, परंतु युरोपमधल्या पंपन्या भारताकडून दारूगोळय़ाचे केसिंग आयात करून युव्रेनला निर्यात करत आहेत.
युद्धभूमीवरती शस्त्रांचे आयुष्य हे अनेक वर्षे असते, परंतु दारूगोळा एकदा फायर झाला की, पुन्हा वापरता येत नाही. त्याऐवजी नवीनच दारूगोळा खरेदी करावा लागतो. सुरुवातीला युक्रेनला युरोपमधल्या सगळ्या देशांनी आपल्याकडे असलेली जुनी शस्त्रे आणि जुना दारूगोळा दिला, परंतु युद्ध दीर्घकाळ सुरू असल्यामुळे आता सगळा जुना दारूगोळा संपला आहे.
जगातला सर्वात मोठा शस्त्र आणि दारूगोळा निर्यात करणारा देश अमेरिकासुद्धा पुरेसा दारूगोळा हा वेगवेगळ्या देशांना पुरवू शकत नाही. याची दोन मुख्य कारणे आहेत, एक आहे इस्रायल आणि हमासमध्ये चाललेले युद्ध. जे अमेरिकेकरिता अत्यंत महत्त्वाचे आहे आणि दुसरे अमेरिकेमध्ये असलेली भीती. सध्या चाललेल्या वेगवेगळय़ा युद्धांचा फायदा घेऊन चीन तैवानवर लष्करी हल्ला करून कब्जा करू शकतो. म्हणून अमेरिका वेगाने तैवान, जपान आणि इतर मित्र राष्ट्रांची लढण्याची क्षमता वाढवत आहे. ज्यामध्ये दारूगोळा पण सामील आहे. यामुळेच अमेरिकेकडे युव्रेनला दारूगोळा पुरवण्याची फारशी क्षमता शिल्लक नाही. चीन अर्थातच युक्रेनला दारूगोळा पुरवणार नाही. मात्र रशियाला चीन नक्कीच दारूगोळा पुरवत आहे.
युक्रेनला दारूगोळा आयात करण्याकरिता वेगवेगळ्या देशांकडून मदत घ्यावी लागते आणि यामध्येच युरोपमधल्या काही पंपन्या भारतातून तोफगोळ्यांचे शेल केसिंग आयात करून युरोपमध्ये त्यामध्ये स्पह्टके भरून ते युव्रेनला विकत आहेत. म्हणजेच भारताचा दारूगोळा युव्रेनकडे डायरेक्ट जात नाही, परंतु युरोपमधल्या पंपन्या भारताकडून दारूगोळय़ाचे केसिंग आयात करून युव्रेनला निर्यात करत आहेत.
रशियाविरुद्धच्या युद्धात अमेरिका-युरोपकडून युव्रेनला सर्व प्रकारची लष्करी मदत केली जाते. मात्र रशिया मित्रराष्ट्र असल्याने भारताने युव्रेनला शस्त्रास्त्रांची मदत किंवा रशियावर निर्बंध लादणाऱ्या पाश्चिमात्य गटात सहभागी होण्यास नकार दिला आहे. असे असतानाही युव्रेनकडून ‘मेड इन इंडिया’ दारूगोळ्याचा वापर होत असल्याबद्दल रशियाकडून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. भारतीय दारूगोळा युव्रेनला कसा मिळाला? हा पुरवठा थांबविणे भारताच्या हाती आहे का?
युक्रेनला भारताकडून थेट मदत होत नसली तरी भारत युरोपातील अनेक देशांना शस्त्रास्त्रे, तोफगोळे निर्यात करतो. यात इटली आणि चेक प्रजासत्ताक हे मोठे आयातदार देश युव्रेनला तोफगोळ्यांचा पुरवठा करतात. भारताकडून आयात केलेल्या केसिंगमध्ये स्पह्टके भरून ‘एमईएस’कडून युव्रेनला दिली जातात. अनेक युरोपीयन पंपन्यांकडे तोफगोळे निर्मितीची क्षमता असली तरी मोठय़ा प्रमाणात केसिंग उत्पादन करण्याची सुविधा नाही. अशा कंपन्या या भारताकडून तोफगोळ्यांचे केसिंग आयात करतात. त्यांच्यामार्फत भारतीय बनावटीचे हे तोफगोळे युव्रेनकडे आयात होतात. युक्रेनकडील भारतीय तोफगोळ्यांचे प्रमाण एक टक्क्यापेक्षाही कमी आहे.
‘आतापर्यंत किमान दोन वेळा रशियाने भारतीय अधिकाऱ्यांच्या ही बाब निदर्शनास आणून दिली आहे. कझाकस्तानमध्ये झालेल्या चर्चेवेळी रशियाचे संरक्षणमंत्री सर्गेई लाव्हरोव्ह यांनी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याकडे यासंदर्भात तक्रार नोंदविली. विशेषतः सरकारी मालकीच्या शस्त्रास्त्र पंपन्यांचा माल युव्रेनच्या हाती जात असल्यामुळे रशिया नाराज आहे.
रशिया हा संरक्षण क्षेत्रातील भारताचा पूर्वापार सर्वात मोठा निर्यातदार आहे. आजही आपली 60 टक्के आयात रशियाकडूनच होते. युद्ध छेडले गेल्यानंतर भारताने रशियाकडून कच्च्या तेलाची आयातही वाढविली आहे. रशियावर निर्बंध लादण्यासाठी युरोप-अमेरिकेबरोबर हातमिळवणी करण्यासही भारताने सातत्याने नकार दिला आहे. असे असताना भारत सरकार रशियाच्या तक्रारीकडे लक्ष का देत नाही?
कोणत्याही संरक्षणविषयक करारात आयात केलेली शस्त्रास्त्रे, दारूगोळा अन्य देशाला विकताना किंवा मदत म्हणून देताना निर्यातदार देशाची परवानगी घेण्याची अट समाविष्ट असते. आपलीच शस्त्रे आपल्या हाती पडून आपल्याविरुद्धच वापरली जाऊ नयेत. युक्रेनचा सर्वात मोठा शस्त्र पुरवठादार असलेल्या अमेरिकेलाही एफ-16 फाल्कन विमाने झेलेन्स्की यांना देण्यास अन्य युरोपीय देशांना परवानगी दिली नव्हती. त्यामुळे भारतीय बनावटीची शस्त्रे युक्रेनला देण्यापासून इटली, झेक प्रजासत्ताकासह अन्य युरोपीय देशांना आपला माल युक्रेनला देण्यास भारत सरकार मज्जाव करू शकते. मात्र आतापर्यंत तरी भारताने हे टाळले आहे.
रशियाच्या विरोधाकडे भारताने कानाडोळा करण्याचे एक कारण आर्थिक असल्याचे सांगितले जात आहे. 2018 ते 2023 या कालावधीत भारताची संरक्षणविषयक निर्यात 3 अब्ज डॉलरच्या वर गेली आहे. 2029 पर्यंत ही निर्यात 6 अब्ज डॉलरवर नेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. जगात दोन ठिकाणी युद्ध सुरू असताना भारतीय संरक्षण उद्योगाला ही एक प्रकारे संधी आहे. लांबत चाललेल्या युरोपियन युद्धापासून देशाचा आर्थिक लाभ होण्याची संधी असल्यामुळे भारतीय बनावटीची तोफगोळ्यांची केसिंग दारूगोळा भरून युक्रेनला देण्यात भारताने आडकाठी आणली नसल्याचे सांगितले जाते.
युक्रेनचा सर्वात मोठा पाठीराखा असलेल्या अमेरिकेशी भारताने अलीकडेच संरक्षण सहकार्य अधिक मजबूत केले आहे. या करारामागे चीनला रोखणे हा उद्देश आहे. अशा वेळी युक्रेनला होत असलेली अप्रत्यक्ष मदत रोखून अमेरिकेची नाराजी ओढवून घेण्याची गरज नाही. शिवाय भारतीय दारूगोळा केसिंगचे प्रमाण हे अगदीच नगण्य असल्यामुळे त्याची युक्रेनला फार मोठी मदत होत नाही. परिणामी रशियाने निषेध नोंदविला असला तरी त्याबाबत पुतिन यांचे प्रशासन लगेच काही मोठे पाऊल उचलेल अशी शक्यता नाही.
युरोपियन देशांनी निर्बंध लावल्यानंतरसुद्धा आपण रशियाकडून मोठ्या प्रमाणामध्ये कच्चे तेल आयात करत आहोत आणि ते शुद्ध करून युरोपला विकत आहोत. यामुळे रशियाला आपण आर्थिक मदतच करत आहोत हे पण रशियाच्या लक्षात आणून देणे महत्त्वाचे आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण आपला आर्थिक आणि सामरिक फायदा करून राष्ट्रहिताचे रक्षण करत आहोत.