>> चंद्रहास रहाटे, आर्थिक सल्लागार
माझा मित्र अजय त्याच्या आईबद्दल सांगत होता. जेव्हा त्याचे बाबा गेले, त्यानंतर पाच-एक महिन्यांत सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आईला पेन्शन चालू झाली. या पाच महिन्यांत ती बरीच शांत असायची. कधी पैसे लागले तर माझ्याकडे मागायची. पण जेव्हा तिच्या बँक अकाऊंटमध्ये दरमहा पेन्शनचे पैसे येऊ लागले तशी ती खूपच आत्मविश्वासाने वागू लागली. अजयच्या आईसारखा आत्मसन्मान खूप कमी स्त्रियांच्या नशिबी आहे. हेल्पेज इंडियाच्या देशांतर्गत पाहणीत असे आढळून आले आहे की, 75 टक्के वृद्ध स्त्रियांचे उत्पन्नच नाही. त्यातील 80 टक्के स्त्रिया आपल्या मुलाबाळांवर अवलंबून आहेत. त्यातील 32 टक्के स्त्रियांना काम करण्यावाचून गत्यंतर नाही. या सर्व स्त्रिया अवलंबून असल्यामुळे आत्मसन्मान गमावून बसल्यात आणि बऱयाच स्त्रिया ज्येष्ठ नागरिक होण्याच्या वयाजवळ येऊन पोहोचल्या आहेत. मुलांच्या आर्थिक अडचणीत आपल्याला बरे नाही व डॉक्टरकडे जायला पैसे हवेत हेदेखील यांना सांगणे अवघड जातेय. काही ठिकाणी मुले आपल्या आई-बाबांच्या उपचारांसाठी पैसे देत नाहीत. त्यामुळे स्वतःसाठी काही पैसे हवे असतील तर यांची काय अवस्था होत असेल विचार करा.
ज्या स्त्रिया कमवीत आहेत त्यादेखील सध्याचे खर्च भागविताना स्वतःच्या निवृत्तीसाठी पैसे बाजूला काढत नाहीत, तर मग घर सांभाळणाऱया स्त्रियांसाठी कोण नियमित उत्पन्नाची सोय करणार? ती आयुष्यभर घरात राब राब राबणार व गरज लागेल तेव्हा नवऱयापुढे हात पसरणार व नव रा नसेल तर मग मुलांकडे पैसे मागणार. ती जेव्हा तरुण आहे व तिचे हातपाय चालतात तोपर्यंत ठीक… नंतर काय? स्त्रियांच्या साठीनंतरच्या उत्पन्नाची सोय व्हायला हवी. कमवित्या स्त्राrने जागरूक होऊन आपल्या निवृत्तीनंतरच्या वेतनाची नको का सोय करायला? तिच्या पतीने स्वतःच्या नावाबरोबर तिच्याही नावावर बचत सुरू करायला हवी ना? तिच्याही आत्मसन्मानाचा विचार करायला हवा ना?
स्वतःच्या नावावर दरमहा आपल्या बँकेत आलेले पैसे प्रत्येक स्त्राrला आत्मसन्मान मिळवून देतील व प्रत्येक स्त्राrचा आत्मविश्वास वाढेल. आपण कुणावर अवलंबून नाही ही भावना वृद्धपकाळात जगण्याची उमेद निर्माण करेल.
या लेखाला साद देऊन जर तुम्ही तुमच्या भावी उत्पन्नासाठी पेन्शन स्कीममध्ये बचत चालू कराल तर तुम्ही नक्कीच हेल्पेज इंडियाच्या सर्वेक्षणामधील 75 टक्के म्हणजे उत्पन्न नसलेल्या स्त्रियांची संख्या येणाऱया काळात नक्कीच नगण्य कराल व येणारा काळ सर्व स्त्रियांसाठी सुवर्णकाळ ठरेल.