>> अनिल दत्तात्रेय साखरे
स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पांडुरंगशास्त्री आठवले, दादाजी यांचा जन्म दिवस 19 ऑक्टोबर अखिल स्वाध्याय परिवारातर्फे मनुष्य गौरव दिन म्हणून मोठ्या प्रमाणावर साजरा केला गेला. भक्ती ही एक सामाजिक शक्ती आहे आणि कुटुंबाच्या, समाजाच्या, देशाच्या आणि जगभरातील आर्थिक, सामाजिक, राजकीय समस्या या भक्तीच्या बैठकीवरतीच सुटू शकतील आणि त्यामुळेच जगामध्ये सुखशांती नांदू शकेल असा दृष्टिकोन दादाजींनी स्वाध्याय परिवाराला दिला. जगभरातील आजचं अस्वस्थ ,तणावग्रस्त, संघर्षमय वातावरण बघता तो जगासाठी खूपच उपयुक्त अन् मार्गदर्शक आहे. दादाजींनी दाखवलेल्या याच भक्तीच्या बैठकीवरती या वर्षी 13 ते 18 ऑक्टोबर असे 6 दिवस देशभरातील वेगवेगळ्या राज्यांतून दीड लाखापेक्षा जास्त कृतिशील स्वाध्यायी, त्यांना सोबत करणारे परिवारातील स्थानिक सदस्यांनी आपापल्या तालुक्यामध्ये, जिह्यामध्ये भक्ती फेरीच्या माध्यमातून वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन गावातील व्यक्तींशी भक्तिपूर्ण अंतःकरणाने निरपेक्ष आणि निःस्वार्थपणे संपर्क साधून, भेटून एक ईश्वराधिष्ठत तरल भावसंबंध बांधण्याचा अभिनव प्रयत्न या कृतीभक्तीच्या माध्यमातून केला आहे,
संपूर्ण जगतामध्ये मानवच संपूर्ण मानवजातीला नष्ट करण्यासाठी उपयोगी ठरतील अशी अत्याधुनिक अस्त्रs, शस्त्रs, विमाने, तोफा, अण्वस्त्रs, ड्रोन, क्षेपणास्त्रs यांचे संशोधन आणि निर्मितीसाठी जगभरात अरबो रुपये खर्च केला जात आहे. आज जगभरामध्ये सुरू असलेल्या दोन वेगवेगळ्या युद्धांमध्ये दिवसागणिक हजारो निरपराध नागरिकांचा बळी जात असताना माणसाला खरा माणूस, मनुष्यातील देवत्व शुभत्व वाढवून चांगला माणूस बनवण्यासाठी कार्य करणारी गीता पाठशाळा आणि दादाजी एकमेव असतील. समाजाचे, लोकांचे वैचारिक मंथन करून धर्म, संस्कृती, अध्यात्माच्या क्षेत्रात क्रांतिकारी बदल करणाऱया पंचरंगी क्रांतीचे प्रणेते असलेल्या दादाजींचा जन्म दिवस 19 ऑक्टोबर हा मनुष्य गौरव दिन म्हणूनच विश्वातील स्वाध्याय परिवार मोठय़ा आनंदाने साजरा करतो.
देशातील तरुण बिघडलेले आहेत, वाईट मार्गाला लागलेले आहेत, व्यसनांच्या अधीन होत आहेत अशी चोहोबाजूंनी तरुणांवरती सर्वत्र टीका होत असताना दादांनी मात्र तरुणांना आत्मीयतेने जवळ केले. त्यांच्यासमोर भव्यदिव्य अशा सांस्कृतिक जीवन जगलेल्या ऋषीमुनींची, संतांची, वेगवेगळ्या धर्मात झालेल्या अवतारांची, जगभरातील आदर्श व्यक्तिमत्त्वाची चरित्रं ठेवली, सद्विचार सद्आचाराचे सिंचन केले. जीवनाकडे सकारात्मकतेने बघण्याचा, मी करू शकतो, बदलवू शकतो असा भव्यदिव्य दृष्टिकोन तयार केला आणि हे सर्व वैज्ञानिक दृष्टिकोन आणि बुद्धिनिष्ठपणे समजावले, त्याच्यामध्ये अस्मितेचे जागरण केले. त्यामुळे आज हे तरुण त्यांच्या भौतिक जीवनामध्ये तर अग्रेसर आहेतच, पण सांस्कृतिक कार्यामध्ये हिरीरीने भाग घेतात. आदरणीय दीदीच्या मार्गदर्शनाखाली मागील काही वर्षांपासून डीबीटीचे हे तरुण इतर समाज पारंपरिक दहीहंडी फोडण्यामध्ये मशगूल असताना तरुणांच्या जीवनाशी निगडित असा प्रासंगिक विषय निवडून पथनाटय़ सादर करून श्रीकृष्णाचा संदेश गावोगावी पोहोचवण्याचे कार्य करीत असतात. या वर्षी तर साधारण दीड लाख युवकांनी 14 हजार टीमच्या माध्यमातून गावागावांमधून, शहरांमधून वेगवेगळ्या ठिकाणी 75 हजार पथनाटय़ांचे प्रयोग करून जवळपास 50 लाख नागरिकांपर्यंत कृष्ण जन्माष्टमीचा संदेश पोहोचवला. स्वाध्याय परिवारामध्ये कार्य करणाऱया लाखो तरुणांचे हे सांस्कृतिक कार्य समाजाच्या नजरेत भरणारे अंजन घालणारे असेच आहे,
स्वाध्याय परिवार आणि भारतीयांसाठी आणखी एक आनंदाची बातमी म्हणजे अमेरिकेतील जॉर्जिया राज्याच्या गव्हर्नरांनी जॉर्जिया प्रांतामध्ये सुरू असलेल्या स्वाध्याय परिवाराच्या कार्याची अगदी आपुलकीने नोंद घेऊन मागील वर्षांपासून जॉर्जियामध्ये 19 सप्टेंबर हा दादाजींचा जन्मदिवस प्ल्स्aह अुहग्tब् अब् म्हणून सरकारी पातळीवर साजरा करण्याचे ठरवले आहे आणि सध्याची जगभरातील तणावग्रस्त अशी परिस्थिती, दोन वर्षापासून सुरू असलेले रशिया- युक्रेन युद्ध, मागील वर्षापासून सुरू झालेला इस्रायल – पॅलेस्टाईन संघर्ष, त्यासोबत जगभरात चाललेले धार्मिक, वांशिक, आर्थिक, शिवाय देशादेशांमधील संघर्ष बघता दादाजींनी मांडलेला Divine Brotherhood of man under the fatherhood of God हाच विचार जगभरातील वेगवेगळ्या धार्मिक, आर्थिक, राजकीय विचारधारा राखणाऱया लोकांना, राष्ट्रांना एकत्र आणू शकतो, असे मत व्यक्त केले आहे.