>> अजित कवटकर
आजची अंदाजे जागतिक लोकसंख्या 8.2 अब्ज एवढी आहे.त्यातील जवळ जवळ 65 टक्के लोकसंख्या ही 35 वयोगटाखाली असल्याचा अंदाज आहे. उद्यमशील, कार्यशील, उत्पादनशील अशी ही युवा शक्ती उद्याच्या जगाला आकार देणार आहे. तिची बौद्धिक क्षमता आणि सर्जनशीलता पाहता त्यांच्या इच्छाशक्तीने घडणारे बदल हे अनन्यसाधारण असतील. मानवाला अधिक सामर्थ्य व जीवनाला अधिक शाश्वत करणारे ते असतील. हे जसं विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन क्षेत्रात बघायला मिळणार आहे तसे ते राजकीय पटलावरदेखील मोठी उलथापालथ करून त्या माध्यमाद्वारे सामाजिक क्रांती घडविणार. आज जीवनाच्या, समाजाच्या, विश्वाच्या प्रत्येक पैलूवर ज्याचा सर्वाधिक परिणाम होत आहे,
जागतिक साक्षरतेचे प्रमाण दिवसागणिक वाढत आहे. निरक्षरतेचे मागासलेपण हद्दपार होण्याच्या दिशेने आहे. इंटरनेटने एक समांतर ज्ञानदानाची व्यवस्था निर्माण केली आहे, ज्याच्या सहाय्याने अमर्याद अध्ययनाची संधी सर्वांना प्राप्त झाली आहे. त्यामुळे वृद्धिंगत झालेली समजक्षमता ही न्याय – अन्याय, खरं – खोटं, बरं – वाईट यामधील फरक बरोबर समजू शकते आणि म्हणूनच जाणीवपूर्वक वा अजाणतेपणातून केलेल्या चुका, भ्रष्टाचार तसेच अवैध, अनैतिक राजकारण हे तिथल्या तिथे आज उघडे पडत आहे वा पाडले जात आहे. असे असूनदेखील जेव्हा आपल्या अहंकारासाठी, स्वार्थासाठी बनवलेली अन्यायकारक धोरणे, केलेले गुन्हे / चुका मान्य करण्याचा – रोलबॅक करण्याचा राजकीय मुत्सद्दीपणा जिथे दाखवला जात नाही तिथे त्याविरुद्धचा राग रस्त्यावर उतरतो, सत्तांतरासाठीचा लढा उभारतो.
आपला आशिया खंड हा सर्वाधिक लोकसंख्या असलेला खंड आहे. जगातील 193 देशांमधील सर्वाधिक लोकसंख्या असलेली पहिली पाच राष्टे^ याच खंडावर आहेत आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे याच खंडाला सध्या हुकूमशाहीची लागण झाली आहे. लोकशाहीचा मुखवटा घालून एकाधिकारशाही गाजवण्याचा जणू इथे नादच लागला आहे. असंवैधानिक मार्गाने विरोधक संपवून आपली एकहाती सत्ता स्थापन करण्याची इथे होड लागलेली दिसते. लोकशाही मार्गाने लोकशाही संपविण्याचे नवे कुटील राजकारणाचे तंत्र इथे विकसित झाले आहे. लोकशाहीच्या रक्षणासाठी कार्यरत असणाऱया स्वायत्त संस्थांना व कायदा – सुरक्षा जोपासण्याची जबाबदारी असणाऱया व्यवस्थांना आपल्या इशाऱयांवर चुकीच्या पद्धतीने नाचवले, वापरले जात आहे. राज्यावर कर्जाचा डोंगर असताना, सरकारी तिजोरीत खडखडाट असताना, गरीबांना – शेतकऱयांना – कष्टकऱयांना त्यांच्या मेहनतीचा मोबदला मिळत नसतानादेखील आज सरकार निवडणुकीच्या तोंडावर पैशांची उधळण करून अविचारीपणे मतांसाठी खैराती वाटत फिरत आहे. या असल्या अर्थराजकारणामुळे आपल्या अर्थव्यवस्थेवर आणि त्यामुळे जनसामान्यांवर पुढे जाऊन खूप नुकसानकारक परिणाम होणार आहे. व घाणेरडय़ा राजकारणाला पंटाळला आहे. संयम हरवू लागलेला हा तरुण आता सरकारविरोधात दंड थोपटून पुढे येताना मागे बघत नाही.
सत्ताधाऱयांनी आजच्या तरुणांना गृहीत धरू नये. हुकूमशाहीला, भ्रष्ट व असंवैधनिक सत्ताशासनाला या जगात कुठेच थारा नाही. जिथे कुठे या विकृतीने पाय रोवण्याचे प्रयत्न केले, त्या प्रत्येक ठिकाणी त्यास उखडून समूळ नष्ट करणारे महाभारत घडले. संविधानाचा आत्मा असणारी ही न्याय लोकशाही नष्ट करून जे उरणार ते पूर्णतः असंवैधानिकच असणार. न्याय, समता, बंधुता, लोकशाही तत्त्वांवर आधारलेली राष्ट्राची घडी बसवायला अनेकांनी आपले जीवन झिजवले. हे बलिदान, हा इतिहास पुसून टाकणाऱयांना कोण कसे काय माफ करेल ! न्याय, सत्य, प्रगतीसाठी सत्तांतर घडवून आणण्याची क्षमता असणारी युवा शक्ती तर मुळीच करणार नाही.