>> प्रसाद ताम्हनकर
‘अॅपल’ आणि ‘इलॉन मस्क’ एका शीर्षकात समजू शकतो, पण मध्येच हे ईव्हीएम कुठून अवतरले? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, पण तंत्रज्ञान विश्वात आपल्या भन्नाट कल्पनांमुळे, साकारत असलेल्या भव्य प्रकल्पांमुळे आणि तंत्रज्ञानावर हुकूम गाजवण्याच्या जिद्दीने प्रत्येक दिवसाची सुरुवात करण्याऱया इलॉन मस्क यांच्या काही टिपण्यांमुळे हे सगळे विषय एकाच ठिकाणी जमा झाले आहेत. काही दिवसांपूर्वी इलॉन मस्क यांनी निवडणुकीत मतदानासाठी वापरले जाणारे ईव्हीएम आणि अॅपल या जगप्रसिद्ध कंपनीच्या नव्याने येत असलेल्या अॅपल इंटेलिजन्स या तंत्रज्ञानाबद्दल चिंता व्यक्त केली आणि त्याच्या रोखठोक शब्दांमुळे जगभरात या दोन्ही विषयांवर मतमतांतराचा धुरळा उडाला.
हिंदुस्थानात नुकतीच सर्वोच्च अशी लोकसभा निवडणूक पार पडली. निवडणुकीची घोषणा होण्याच्या आधीपासून ते निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरदेखील सतत चर्चेत होते आणि हे ते म्हणजे मतदानासाठी वापरले जाणारे ईव्हीएम मशीन. या मशीनच्या सुरक्षेच्या संदर्भात जवळपास सर्व विरोधी पक्षांनी नाराजीचा सूर काढला होता आणि आजही ते त्यांच्या मतावर ठाम आहेत. आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (Aघ्) मदतीने हे मशीन हॅक होण्याची शक्यता जवळपास शक्य नसली तरी ती भविष्यातली मोठी जोखीम ठरू शकते, असे मत इलॉन मस्क यांनी मांडले. यासाठी पुन्हा एकदा आपण बॅलेट पेपरकडे वळायला हवे असे त्यांनी नमूद केले.
जेव्हा इलॉन यांनी आपले हे मत व्यक्त केले, नेमकी त्याच काळात मुंबईतील एका मतदारसंघातील उमेदवाराच्या नातेवाईकाचा फोन मतमोजणी कार्यालयातील एका ईव्हीएम मशीनला जोडलेला असल्याची बातमी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत होती. राहुल गांधींसकट अनेकांनी यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे यासंदर्भात खुलासा मागितला. सदर मतमोजणी केंद्रावरील रिटर्निंग ऑफिसरने ही बातमी खोटी असल्याचा निर्वाळा दिला आणि ईव्हीएम हॅक होणे शक्य नसल्याचा दावादेखील केला. मात्र या दोन्ही घटना एकाच वेळी समोर आल्याने आता तंत्रज्ञान क्षेत्रात आपला दबदबा उमटवणारे जगभरातील इतर मान्यवर यासंदर्भात काय प्रतिािढया देतात ते बघणे महत्त्वाचे असणार आहे.
ईव्हीएमचे वादळ उठवण्याच्या एक आठवडा आधी इलॉन मस्क यांनी अॅपलच्या येत असलेल्या नव्या तंत्रज्ञानाबद्दलदेखील जाहीर शंका व्यक्त केली आणि चांगलाच गदारोळ माजला. अॅपल ही प्रसिद्ध तंत्रज्ञान कंपनी आपल्या युजर्ससाठी आपल्या वर्ल्डवाईड डेव्हलपर्स कॉन्फरन्समध्ये (sंsंअ) अॅपलने नुकतीच ध्जहघ् बरोबरच्या भागीदारीची घोषणा केली. या दोघांच्या संयुक्त मदतीने आता अॅपल युजर्स आपल्या फोनमध्ये ण्प्atउझ्ऊ हे ध्जहघ् चे आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूल मोफत वापरू शकणार आहेत. अॅपलच्या याच निर्णयावर इलॉन यांनी कडाडून टीका केली आहे. ध्जहघ् ची सुरक्षा आणि प्रायव्हसीविषयी त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. या थर्ड पार्टी टूलच्या वापराने वैयक्तिक माहितीची सुरक्षा पूर्णपणे धोक्यात येणार आहे, असे त्यांचे मत आहे.
जर ही भागीदारी प्रत्यक्षात उतरली आणि अॅपलने आपल्या विविध डिव्हाईसमध्ये ती आणली तर अॅपलची अशी सर्व उपकरणे (आयफोन, आयपॅड, आयमॅक) ही आपल्या कंपनीत वापरण्यास तो बंदी घालणार असल्याचेदेखील त्याने जाहीर केले आहे. एवढेच नाही, तर कंपनीला कामानिमित्त भेटी देणाऱया लोकांचीसुद्धा तपासणी करण्यात येईल आणि त्यांच्याकडे एखादे अॅपलचे उपकरण आढळल्यास ते प्रवेशद्वारावर जमा करावे लागेल असा नियमदेखील बनवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अॅपलने मात्र हे टूल आणताना आपण युजर्सच्या प्रायव्हसीची पूर्ण काळजी घेतली असून युजर्सचा कोणताही डाटा अॅपल सेव्ह करणार नाही याची खात्री दिली आहे.
एआय, मशीन लर्निंग हे भविष्यातले तंत्रज्ञान असेल. ते मानवी जीवनाची पूर्ण व्याख्या बदलून टाकेल, मानवी प्रगतीसाठी त्याचे अमूल्य योगदान असेल, असे ठामपणे प्रतिपादन करणारे अनेक तंत्रज्ञ आता या तंत्रज्ञानापासून जपून राहण्यास सांगू लागले आहेत, त्यातील धोके दाखवत आहेत हे विशेष. या सगळ्या गदारोळात सामान्य माणसाने नक्की काय करावे आणि काय करू नये याचे मार्गदर्शन जास्त आवश्यक आहे.