सेऊलमधील न्यायालयाने दक्षिण कोरियाचे माजी राष्ट्राध्यक्ष येओन सुक योल यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले. त्यांनी मध्यरात्री देशात मार्शल लॉ लागू करून खळबळ उडवून दिली होती. मार्शल लॉ लागू करण्याच्या अयशस्वी प्रयत्नांनंतर त्यांच्यावर महाभियोग खटला चालवून त्यांना हटवण्यात आले होते.