Pahalgam Attack नंतर हिंदुस्थानच्या लष्करानं उचलली पाऊलं; PoK मधील 42 दहशतवादी लाँच पॅड शोधून काढले

Security personnel maintain vigil near Dal Lake amid high alert following Pahalgam terror attack
(Photo: PTI)

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात एका नेपाळी नागरिकासह 26 जण ठार झाल्यानंतर 40 तासांमध्ये हिंदुस्थानच्या सुरक्षा दलांनी पाकव्याप्त काश्मीर (PoK) मध्ये असलेल्या विशिष्ट दहशतवादी लाँच पॅड आणि प्रशिक्षण शिबिरांवर लक्ष केंद्रित केले आहे.

गुप्तचर संघटनांच्या माहितीनुसार, या ठिकाणांवर हिंदुस्थानी यंत्रणा बारकाईने लक्षं ठेवत आहेत. इथल्या दहशतवाद्यांच्या हालचाली टिपण्यात येत आहेत. देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे.

लष्कर या घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. याभागाची अचूक माहिती आणि घुसखोरीविरोधात कारवाई करण्यासाठीचे विविध पर्याय शोधण्याचे काम सुरू आहे.

गुप्तचर विभागाच्या माहितीतून समोर आले आहे की जम्मू आणि कश्मिरात विरुद्ध घुसखोरी करण्यासाठीच्या विविध छावण्यांमध्ये अंदाजे 150-200 प्रशिक्षित दहशतवादी सध्या तैनात आहेत.

पाकिस्तानी सैन्य या घुसखोरीसाठी मदत करत असल्याचे वृत्त आहे. बट्टल सेक्टरजवळ अलिकडेच तसा प्रयत्न झाला. त्यावेळी मोठी चकमक झाली. या अयशस्वी घुसखोरीच्या प्रयत्नात 642 मुजाहिद बटालियनला मोठे नुकसान झाले असल्याचा दावा सूत्रांनी केला आहे.

याव्यतिरिक्त, जम्मू आणि कश्मीरमध्ये हिजबुल मुजाहिदीन (एचएम), जैश-ए-मोहम्मद (जेईएम) आणि लष्कर-ए-तैयबा (एलईटी) चे एकूण 60 परदेशी दहशतवादी सक्रिय आहेत. केंद्रशासित प्रदेशात सक्रिय स्थानिक दहशतवाद्यांची संख्या 17 इतकी आहे.