
लष्कराने अनंतनाग जिह्यातील बिजबेहारा येथील आदील हुसैन ठोकेर ऊर्फ आदील गुरी, अवंतीपुरा येथील आसीफ शेख आणि पुलवामा येथील एहसान शेख या दहशतवाद्यांची घरे पाडली होती. आज पुलगाम येथे झाकीर अहमद गनी आणि शोपियान जिह्यातील छोटीपोरा येथील लष्कर-ए-तोयबाचा कमांडर शाहीद अहमद पुट्ट्य यांची घरे स्फोटकांनी जमीनदोस्त केली.