
पार्किंगच्या वादातून लष्करातील कर्नल आणि त्यांच्या मुलाला मारहाण केल्याप्रकरणी 12 पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. शनिवारी कर्नलच्या पत्नीने पटियाला उपायुक्त कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करून न्यायाची मागणी केली. यावेळी अनेक माजी सैनिकांनी उपस्थित राहून निदर्शने केली. निदर्शनादरम्यान कर्नल यांची पत्नी जसविंदर कौर बाथ यांनी पोलीस कर्मचाऱ्यांवर पती आणि मुलाला बेदम मारहाण केल्याचा आरोप केला. अलीकडेच कर्नल पुष्पिंदर सिंग बाथ यांच्यावर हल्ला झाला होता. तपासाला गती देण्यासाठी उच्चस्तरीय विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले आहे.