
हिंदुस्थानी सैन्य दलात अग्निवीर भरती प्रक्रियेसाठी 25 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अग्निवीर जनरल डय़ुटी (जीडी) पदासाठी उमेदवार किमान 45 टक्के गुणांसह दहावी उत्तीर्ण असावा. उमेदवाराकडे हलके मोटर वाहन चालविण्याचा परवाना असल्यास चालक भरतीमध्ये प्राधान्य दिले जाईल, तर अग्निवीर लिपिक-स्टोअरकिपर तांत्रिक पदासाठी उमेदवार कोणत्याही शाखेत किमान 60 टक्के गुणांसह बारावी उत्तीर्ण झालेला असावा. भरतीसंबंधी सविस्तर माहिती www.joinindianarmy.nic.in यावर दिली आहे.