कोल्हापूरच्या स्वप्निल कुसाळेने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 50 मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात कांस्य पदक पटकावत महाराष्ट्राच्या तमाम जनतेचे स्वप्न साकार केले होते. त्याच बरोबर पॅरा ऑलिम्पिकमध्ये सांगलीच्या सचिन सर्जेराव खिल्लारी यांनी चमकदार कामगिरी करत गोळाफेकीच्या एफ 46 प्रकारात रौप्य पदक पटकावले होते. महाराष्ट्राच्या या दोन्ही सुपुत्रांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 17 जानेवारी 2025 रोजी राष्ट्रपती भवनामध्ये अर्जुन पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.
Arjuna Award – महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा, स्वप्नील कुसाळे आणि सचिन खिलारी यांना अर्जुन पुरस्कार जाहीर
वाचा सविस्तर – https://t.co/4D93xVKt3M pic.twitter.com/Dwkzpl9Xim— Saamana Online (@SaamanaOnline) January 2, 2025