
जन्म प्रमाणपत्रात नावात बदल झाल्याने त्यात दुरुस्ती करण्याचा अर्ज करणाऱ्या व्यक्तीकडे सदरच्या कामासाठी चार हजार रुपयांची मागणी करून त्यापैकी दोन हजार रुपये घेताना पालिकेच्या ई वॉर्डातील आरोग्य विभागातला श्रमिक अर्जुन निशाद (35) याला अॅण्टी करप्शन ब्युरोच्या पथकाने रंगेहाथ पकडले. रंजन (53, नाव बदललेले) यांनी ई वॉर्डातून जन्मदाखला मिळवला होता; परंतु त्या दाखल्यावरील त्यांचे व त्यांच्या आईचे नाव चुकविण्यात आले होते. त्यामुळे ती चूक दुरुस्त करण्यासाठी रंजन यांनी आरोग्य विभागात अर्ज केला होता. त्या अर्जाच्या अनुषंगाने काम करून देण्याच्या मोबादल्यात निशाद याने चार हजार रुपयांची मागणी केली. लाच द्यायची नसल्याने रंजन यांनी अॅण्टी करप्शन ब्युरोकडे तक्रार केली. त्यानुसार अॅण्टी करप्शन ब्युराने ट्रप लावून निशाद याला दोन हजार रुपये घेताना रंगेहाथ पकडले.