
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर गायक अरिजीत सिंग याने 27 एप्रिल रोजी चेन्नई येथे होणारी काॅन्सर्ट रद्द केली. अरिजीतने त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर काॅन्सर्ट आयोजकांची एक पोस्ट शेअर केली. ज्यांनी तिकिटे खरेदी केली आहेत, त्यांना पूर्ण रिफंड मिळेल. परिस्थिती समजून घेतल्याबद्दल धन्यवाद,’ असे अरिजीतने म्हटले आहे.