मोबाईलवरून मतदान केंद्रांत वादावादी

मुंबईतील अनेक भागांत मतदान पेंद्रावर मोबाईल बंदीमुळे मतदान करताना गेटवरच मोबाईल निवडणूक कर्मचाऱयाच्या हाती सोपवावा लागत होता. गेटवर लागून असलेल्या लाकडी फडताळावर हे मोबाइल कसेही ङ्खेवले जात होते. त्यामुळे मोबाइल हरवला तर तुमच्याकडून भरून घेईन, असा दम काही मतदार देत होते. मोबाइल बंदी करताना तो ङ्खेवण्याची व्यवस्था न केल्यामुळे मतदार आणि कर्मचारी अशा दोघांचीही गोची दिसली. मतदानाला जाताना मोबाइल घेऊन जायचा का नाही, असा प्रश्न मतदाराला पडत होता तर मोबाइल हरवला तर तो कसा भरून द्यायचा, असे कर्मचाऱयांना वाटत होते. मुंबईच्या इतर काही मतदारसंघांत मतदाराला मोबाइल बंद करून प्रवेश देण्यात येत होता. अनेक ङ्गिकाणी मोबाईलवरून गोंधळ उडाल्याचे दिसले.