
उन्हाळ्यात अतिनील किरणांमुळे त्वचा टॅन होण्यास सुरुवात होते. खासकरून आपल्या हाताची आणि चेहऱ्याची त्वचा उन्हाळ्यात फार टॅन होते. आपले हात सूर्याच्या संपर्कात अधिक प्रमाणात येतात. अशा परिस्थितीत, हानिकारक किरणांपासून हातांचे संरक्षण करणे खूप कठीण आहे. हातांवरील टॅन काढण्यासाठी आपण काही घरगुती उपायांचा अवलंब करू शकतो. टॅनिंगमुळे अकाली वृद्धत्वाचा धोका वाढतो. आपले हात सूर्याच्या सर्वात जास्त संपर्कात असतात. यामुळे, हानिकारक किरणांपासून आपले हातांचा बचाव करणे कठीण असते. अशा परिस्थितीत आपण काही घरगुती उपायांचा अवलंब करु शकतो.
दही आणि हळदीचा पॅक – दह्यामध्ये प्रोबायोटिक्स असतात जे त्वचेला हलके आणि मॉइश्चरायझ करतात तर हळद त्वचेचा रंग सुधारते. एक वाटी दही घ्या आणि त्यात 1 चमचा हळद घाला. ते एकत्र करा आणि ते मिश्रण तुमच्या टॅन झालेल्या हातांवर लावा. सुमारे 20 मिनिटे तसेच राहू द्या आणि स्वच्छ पाण्याने धुवा.
लिंबाचा रस – लिंबाच्या रसात असलेले व्हिटॅमिन सी त्वचेच्या पेशींना अतिनील किरणांपासून वाचवते. एक वाटी कोमट लिंबाचा रस घ्या आणि टॅन झालेले हातांवर हा रस लावावा. किमान 15 मिनिटे हात तसेच ठेवून द्यावेत. त्यानंतर थंड पाण्याने हात धुवावे.
बदामाची पेस्ट – बदामांमध्ये भरपूर जीवनसत्त्वे असतात. ते त्वचेसाठी फायदेशीर आहे. यासाठी 5 ते 6 बदाम घ्या आणि रात्रभर भिजत ठेवा. बदाम थोडे दुधात मिसळा आणि पेस्ट बनवा. ही पेस्ट लावा आणि रात्रभर तसेच राहू द्या आणि स्वच्छ पाण्याने धुवा.
चंदन आणि हळद पावडर – 2 चमचे चंदन पावडर आणि हळद पावडर घ्या आणि ते चांगले मिसळा. त्यात 2 ते 3 थेंब गुलाबजल मिसळा आणि घट्ट पेस्ट बनवा. ही पेस्ट तुमच्या हातांना लावा आणि 30 मिनिटे तसेच राहू द्या. ते स्वच्छ पाण्याने धुवा. ही पेस्ट त्वचेचा रंग सुधारते.
कोरफड जेल – कोरफड जेलमध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. हे त्वचेच्या पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण करतात. हे टॅनिंग दूर करण्यास मदत करतात. कोरफडीच्या पानांच्या रसातून थोडे ताजे कोरफडीचे जेल घ्या आणि ते तुमच्या हातांना लावा. रात्रभर तसेच राहू द्या आणि सकाळी स्वच्छ पाण्याने धुवा.
काकडीची पेस्ट – काकडीत भरपूर जीवनसत्त्वे असतात. जे तुमची त्वचा ताजी ठेवू शकते. यामुळे हरवलेला चमक परत मिळविण्यात मदत होऊ शकते. एक किंवा दोन काकडीचा रस घ्या आणि त्यात काही थेंब लिंबाचा रस घाला. ही पेस्ट तुमच्या हातांना लावा आणि ३० मिनिटे तसेच राहू द्या. यानंतर ते पाण्याने धुवा.
(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)