
पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (PCOS) हा एक अंतःस्रावी (हार्मोनल) विकार आहे. यामुळे जळजळ, ओव्हेरियन सिस्ट होण्याची शक्यता असते. 2019 च्या एका अभ्यासात असे आढळून आले की PCOS रुग्णांपैकी 33% ते 83% रुग्ण लठ्ठ असतात. परिणामी, PCOS असलेल्या व्यक्तींना वजन कमी करण्यासाठी आणि हार्मोनल संतुलन राखण्यासाठी काही पदार्थ टाळण्याचा सल्ला दिला जातो. याव्यतिरिक्त, PCOS असलेल्या अनेक महिलांना मासिक पाळीपूर्वी त्रास होतो. काही महिलांना त्यांच्या मासिक पाळी दरम्यान मायग्रेनचा त्रास होतो. PCOS असल्यास तुम्ही काही पदार्थ हे टाळणं खूप गरजेचे आहेत.
प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ हे टाळायलाच हवेत. तसेच अधिक सोडियमचे प्रमाण आहारातून पूर्णपणे कमी करावे. सोडियमचे प्रमाण अधिक असल्याने, पीसीओएस ग्रस्तांमध्ये जळजळ वाढवते त्यामुळे वजन वाढू शकते. म्हणून पीसीओएस रुग्णांनी असे पदार्थ टाळावेत. चिकन किंवा टर्की यासारखे मांस खाणे प्रजनन प्रणालीच्या आरोग्यास मदत करेल. ओमेगा-3 फॅटी अॅसिड असलेले पदार्थ खाण्यावर अधिक भर द्यायला हवा.
अधिक प्रमाणात लाल मांस खाल्ल्याने प्रोजेस्टेरॉनची पातळी कमी होऊ शकते. तसेच शरीरामध्ये जळजळ सुद्धा मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता असते.
पीसीओएस असलेल्या महिलांनी प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ खाणे टाळावे. यामध्ये ब्रेड, तांदूळ, पेस्ट्री आणि बटाटे यांचा समावेश आहे. मुख्य म्हणजे पीसीओएस असलेल्या महिलांना मधुमेह होण्याची शक्यता जास्त असते. चिकन किंवा मासे यांसारखे लीन प्रोटीन इन्सुलिन रेझिस्टन्स असलेल्यांसाठी अगदी योग्य आहे. कारण त्यात फॅट कमी आणि प्रोटीन जास्त असते.
तळलेले पदार्थांमध्ये सॅच्युरेटेड फॅट्सचे प्रमाण जास्त असते. हे दोन्हीही पीसीओएस असणाऱ्यांसाठी घातक मानले जाते. हे पदार्थ खाण्यामुळे कर्करोग, वजन वाढणे आणि जळजळ होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. मीठाचे प्रमाण अधिक असल्यामुळे, PCOS ग्रस्त असलेल्यांचे पोट फुगणे आणि पोटात जळजळ होण्याची शक्यता अधिक असते.
PCOS असलेल्या रुग्णांनी हायड्रोजनेटेड किंवा ट्रान्स फॅट्स सारखे पदार्थ खाणे टाळावे. या पदार्थांमुळे शरीरातील इस्ट्रोजेन पातळी वाढते. परिणामी PCOS लक्षणे आणखी बिघडू शकतात. या चरबीमुळे मधुमेह, लठ्ठपणा आणि हृदयरोगाचा धोका देखील वाढतो.
(कोणतेही उपचार करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)