शिवसेनेचे बाळासाहेब थोरात यांचा अर्ज दाखल

शहराचे ग्रामदैवत असलेल्या संस्थान गणपतीची आरती करून मध्य विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे व शिवसेनेचे अधिकृत उमेदवार बाळासाहेब थोरात यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून मध्य विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून शिवसेनेचे शहरप्रमुख बाळासाहेब थोरात यांचे नाव जाहीर करण्यात आले. त्यानुसार आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मध्य मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार बाळासाहेब थोरात यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी शहराचे ग्रामदैवत असलेल्या संस्थान गणपतीची आरती केली. याप्रसंगी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, मराठवाडा सचिव अॅड. अशोक पटवर्धन, सहसंपर्कप्रमुख त्र्यंबक तुपे, माजी महापौर नंदकुमार घोडेले, सुदाम सोनवणे, शीला गुंजाळे, उपजिल्हाप्रमुख आनंद तांदुळवाडीकर, गणू पांडे, राजू इंगळे, हिरालाल सलामपुरे, लक्ष्मीनारायण बाखरीया, राजू राठोड, श्रीरंग आमटे पाटील, उपशहरप्रमुख संदेश कवडे, संजय हरणे, बाळू गडवे, बंटी जैस्वाल, मिथुन व्यास, शेख रब्बानी, राजेंद्र दानवे, नारायण आघाव, माजी नगरसेवक मकरंद कुलकर्णी, मोहन मेघावाले, बन्सीधर जाधव, सीताराम सुरे, सचिन खैरे, रुपचंद वाघमारे, रविकांत गवळी, किशोर नागरे, प्रफुल्ल मालानी, किशोर तुळशीबागवाले, सुधाकर कापरे, महिला आघाडीच्या सुनीता देव, सुनीता आऊलवार, आशा दातार, नलिनी बाहेती, मीना फसाटे, सुनीता सोनवणे, प्रतिभा राजपूत, गणेश सुरे, प्रतीक अंकुश, सुरेश फसाटे, सचिन गोखले, नितेश वहाटुळे, संतोष गादिया, सुरेश टाक, युवासेनेचे जिल्हा युवा अधिकारी हनुमान शिंदे, अभिजीत थोरात, संदीप लिंगायत, नागेश थोरात, मनोज क्षीरसागर, सागर खत्री आदी उपस्थित होते.