अ‍ॅपलचे मार्चमध्ये मॅकबुक एअर मॉडल

अ‍ॅपलने नुकताच आयफोन 16 ई लाँच करून ग्राहकांना एक सुखद धक्का दिला आहे. कंपनी आता पुढील महिन्यात मॅकबुक एअर लाँच करण्याची तयारी करत आहे. या मॅकबुकमध्ये एम4 चिपसेटचा सपोर्ट मिळणार आहे. म्हणजेच हे नवीन जनरेशनच्या प्रोसेसरसोबत येईल. कंपनीने लाँचिंगची संपूर्ण तयारी केली आहे. तसेच रिटेल, मार्केटिंग आणि सेल्स टीमनेही तयारी सुरू केली आहे. 13 इंच आणि 15 इंचमध्ये मॅकबुक एअर लाँच केले जाऊ शकते. तसेच मॅकबुक एअरची डिझाईन आधीसारखीच असू शकते.