ऍपलचे हैदराबादेत  एअरपॉड्सचे उत्पादन

अमेरिकन कंपनी एप्रिलपासून हैदराबाद येथील फोक्सकॉन प्लांटमध्ये आपल्या एअरपॉड्सचे उत्पादन सुरू करणार आहे. येथे बनवण्यात आलेल्या प्रोडक्ट्सची निर्यात केली जाणार आहे. फोक्सकॉनने ऑगस्ट 2023 मध्ये या फॅक्टरीची स्थापना केली आहे. यासाठी ऍपलने 400 मिलियन अमेरिकन डॉलर म्हणजेच जवळपास 3500 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती.