आयपॅड, मॅकचा बदलणार लुक

या वर्षाच्या अखेरपर्यंत अॅपल कंपनी आयपॅड सॉफ्टवेअरमध्ये महत्त्वाचे बदल करत ‘आयपॅड ओएस 19’ सादर करणार आहे.  नव्या रिपोर्टनुसार, आयपॅडला मॅक -ओएससारखा फील देण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. मल्टीटास्किंग आणि उत्पादन क्षमता वाढावी या हेतूने हा बदल करण्यात येत आहे. इंटरफेसची पुनर्रचना या वर्षाच्या अखेरीस होणार आहे आणि यामुळे ऑपरेटिंग सिस्टमचे स्वरूप लक्षणीयरीत्या बदलेल. यामध्ये सिस्टम बटणे, विंडोज, प्रोग्राम, मेनू आणि आयकॉनचे स्वरूप बदलणे आदींचा समावेश आहे. अॅपलच्या उत्पादन विक्रीत अलीकडेच घसरण झाली आहे. त्यानंतर कंपनीकडून बदलाचे पाऊल उचलण्यात आले.