आयफोन 16 लाँचिंग होताच 4 जुने मॉडल बंद

अॅपलने आपली बहुचर्चित आयपह्न 16 सीरिज लाँच केली. या सीरिजअंतर्गत कंपनीने चार नवे आयपह्न लाँच केले. परंतु कंपनीने आता जुने चार आयपह्न बंद केले आहेत. अॅपलने आयफोन 13, आयफोन 14 प्लस, आयफोन 15 प्रो आणि आयफोन 15 प्रो मॅक्स हे चार फोन आपल्या वेबसाईटवरून हटवले आहेत. यामुळे आयफोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना आता अॅपलच्या वेबसाईटवरून हे फोन खरेदी करता येऊ शकणार नाहीत. हे फोन आता केवळ ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म, ऑफलाइन स्टोअर्स किंवा सेकंड हँड फोन उपलब्ध असणार आहेत. हे फोन कंपनीच्या वेबसाईटवरून हटवले असले तरी पंपनी या मॉडल्सला अनेक वर्षांसाठी सॉफ्टवेअर अपडेट आणि एआय फीचर्स सपोर्ट देत राहणार आहे.