ड्रग्ज प्रकरणात सापडला तर पोलीस थेट बडतर्फ, मुख्यमंत्र्यांची कडक तंबी

पोलीस असो वा शिपाई… ड्रग्ज प्रकरणात कुठल्याही पदावरील अधिकारी सापडला तर त्याच्यावर निलंबनाची नव्हे तर थेट बडतर्फीची कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिला.

महाराष्ट्रातील गुन्हे आणि कायदा-सुव्यवस्था यावर चर्चा करण्यासाठी ठाण्यात पोलीस परिषद झाली. त्यानंतर बोलताना फडणवीस म्हणाले, सायबर गुन्हे, महिला आणि लहान मुलांवरील अत्याचार प्रकरणातील गुह्यांबाबत सादरीकरण झाले. हे गुन्हे रोखण्यासाठी तसेच या गुह्यांत आरोपपत्र कसे लवकर दाखल केले जाईल याचीही चर्चा झाली. या गुह्यांबरोबरच ड्रग्ज प्रकरणाबाबत सरकार अत्यंत गंभीर आहे, असे फडणवीस म्हणाले.