मुलांना प्रसिद्धीपासून दूर ठेवण्यासाठी अनुष्का-विराट लंडनला स्थायिक

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा लंडनमध्ये का राहतात, याचे खरे कारण माधुरी दीक्षितचे पती डॉ. श्रीराम नेने सांगितले. अनुष्का आणि विराटला त्यांच्या मुलांना सर्व प्रकारच्या प्रसिद्धीपासून दूर ठेवायचे होते. त्यामुळेच त्यांनी हा निर्णय घेतला, असे डॉ. श्रीराम नेने यांनी सांगितले. यूट्यूबर रणवीर अलाहाबादिच्या पॉडकास्ट मुलाखतीत डॉ. नेने यांनी अनुष्कासोबत झालेल्या संभाषणाची आठवण करून दिली आणि म्हणाले, ‘‘एक दिवस अनुष्काशी बोलताना तिने मला सांगितले की, ते लंडनला जाण्याचा विचार करत आहेत. कारण त्यांना इथे मिळालेल्या यशाचा योग्य आनंद घेता येत नाही. आम्हाला त्यांची समस्या समजते. त्यांना त्यांच्या मुलांना सामान्य पद्धतीने वाढवायचे आहे.’’