जातीव्यवस्था आहे की नाही ते ठरवा, फुले चित्रपटावरून दिग्दर्शक अनुराग कश्यपचा केंद्र सरकारला टोला

महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरील आधारित चित्रपटावर काही ब्राह्मण संघटनांनी आक्षेप घेतला होता. त्यामुळे या चित्रपटाचे प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. आता लेखक दिग्दर्शक अनुराग कश्यपने या वादात उडी घेतली आहे. जातीव्यवस्था होती की नव्हती हे ठरला असा टोला अनुराग कश्यपने लगावला आहे.

इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहून अनुराग कश्यप म्हणाला की, धडक 2 चित्रपटाची स्क्रिनींग सुरू होती, तेव्हा सेन्सॉर बोर्डाचे अधिकारी म्हणाले की ”पंतप्रधान मोदींनी संपूर्ण जातीव्यवस्था नष्ट केली आहे.” त्याच आधारावर संतोष चित्रपट हिंदुस्थानात प्रदर्शित झाला नाही. आता ब्राह्मण समाजाला फुलेंबद्दल आक्षेप आहे. भाऊ जर जातीव्यवस्थाच नाही तर कसले ब्राह्मण? कोण आहात तुम्ही, तुमची का जळतेय? जर जातीव्यवस्थाच नव्हती तर ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले कोण होत्या? जर मोदींनी संपूर्ण जातीव्यवस्था नष्ट केली आहे तर ब्राह्मणवाद अस्तित्वाच नाही. हे लोक सगळ्यांना मुर्ख बनवत आहेत. जातीव्यवस्था आहे की नाही हे एकदाच ठरवा. अले कश्यप म्हणाल आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Anurag Kashyap (@anuragkashyap10)