‘फुले’वरून ब्राह्मण समाजाबाबत वादग्रस्त विधान, अनुराग कश्यपनं मागितली जाहीर माफी; म्हणाला…

महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले या दांपत्याच्या जीवनावर आधारित ‘फुले’ या चित्रपटावर काही ब्राह्मण संघटनांनी आक्षेप घेतला होता. या चित्रपटातील काही दृश्यांना कात्री लावण्याची मागणी करण्यात आली होती. यामुळे प्रदर्शनाची तारखही पुढे ढकलण्यात आली होती. यावरून मोठा वाद उफाळला होता. दिग्गज दिग्दर्शक अनुराग कश्यप यानेही या वादात उडी घेत रोखठोक प्रतिक्रिया दिली होती.

अनुराग कश्यप याने बाह्मण समाजाबाबत एक वादग्रस्त विधान केले होते. त्यामुळे त्याच्यावर चौफेर टीका झाली. सोशल मीडियावरून त्याला आणि त्याच्या कुटुंबाला धमक्याही दिल्या जात होत्या. तसेच याप्रकरणी मुंबईत एफआयआरही दाखल करण्यात आला होती. यानंतर आता अनुराग कश्यप याने एक पोस्ट शेअर करत आपल्या वादग्रस्त विधानाबाबत माफी मागितली आहे.

हे वाचा – जातीव्यवस्था आहे की नाही ते ठरवा, फुले चित्रपटावरून दिग्दर्शक अनुराग कश्यपचा केंद्र सरकारला टोला

अनुराग कश्यपने पोस्टमध्ये म्हटले की, “मी माफी मागतो, पण माझ्या पोस्टसाठी नाही तर त्या एका ओळीसाठी. ज्याला चुकीच्या पद्धतीने घेतले जात असून त्याद्वारे द्वेष पसरवला जात आहे. कुटुंब, मित्र, मुलगी आणि सहकाऱ्यांच्या सुरेक्षेहून कोणतेही विधान किंवा कृती मोठी नाही. त्यांना बलात्कार आणि जिवे मारण्याची धमकी दिली जात असून जे स्वत:ला संस्कारी म्हणतात तेच अशा धमक्या देत आहेत. मी जे बोलले ते शब्द मागे घेऊ शकत नाही, मला शिवीगाळ करायची असेल तर करा. माझ्या कुटुंबाने काही विधान केलेले नाही आणि ते करतही नाही. त्यामुळे माझ्याकडून माफीची अफेक्षा असेल तर मी माफी मागतो, पण ब्राह्मणांना महिलांना सोडा. एवढे संस्कार तर शास्त्रांमध्येही आहेत. फक्त मनुवादमध्ये नाही. त्यामुळे तुम्ही कोणत्या प्रकारचे ब्राह्मण आहात हे ठरवा. बाकी माझ्याकडून माफी.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Anurag Kashyap (@anuragkashyap10)

काय आहे प्रकरण?

‘फुले’ चित्रपटावरून सुरू असलेल्या वादावर अनुराग कश्यप याने सडेतोड भाष्य केले होते. मात्र यादरम्यान एका कमेंटला उत्तर देताना त्याने सोशल मीडियावर वादग्रस्त टिप्पणी केली होती. बाह्मणांवर लघवी करण्यासंदर्भात केलेल्या या कमेंटमुळे अनुराग कश्यपवर जोरदार टीका झाली. मात्र आता त्याने याबाबत माफी मागितली आहे.

मुंबईत एफआयआर दाखल

दरम्यान, याच वादग्रस्त टिप्पणीमुळे अनुराग कश्यपवर मुंबईतील एका वकिलाने एफआयआर दाखल केली आहे. आशुतोष दुबे यांनी आपल्या एक्स (ट्विटर) अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली. अनुराग कश्यपने आक्षेपार्ह आणि अवमानकारक विधान केले असून द्वेष पसरवणाऱ्या विधानांना समाजात थारा नाही. हे सहन करणार नाही, असे दुबे यांनी म्हटले.