Sri Lanka Elections : रानिल विक्रमसिंघेंना धक्का; अनुरा कुमारा दिसानायके श्रीलंकेचे नवे राष्ट्रपती

मार्क्सवादी नेते अनुरा कुमारा दिसानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला आहे. त्यांनी सर्वाधिक मते मिळवून राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकली आहे. विद्यमान राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे तिसऱ्या क्रमांकावर आहेत. तर सजिथ प्रेमदासा दुसऱ्या क्रमांकावर आहे. अनुरा यांच्या पक्षाचे संसदेत केवळ तीन खासदार आहेत.श्रीलंकेच्या निवडणुकीत एकूण 75 टक्के मतदान झाले.

आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या श्रीलंकेच्या राष्ट्रपतींच्या निवडणुकीत मार्क्सवादी नेते अनुरा कुमारा दिसानायके यांनी बाजी मारली आहे. आता अनुरा कुमारा दिसानायके श्रीलंकेचे नवे राष्ट्रपती होणार आहेत. दिसनायके यांना 49.8 टक्के मते मिळाली आहेत. तर समागी जन बालावेगयाचे नेते सजित प्रेमदासा यांना 25.8 टक्के मते मिळाली आहेत.

सध्याचे राष्ट्रपती आणि युनायटेड नॅशनल पार्टीचे नेते रानिल विक्रमसिंघे यांमा 16.4 टक्के मते मिळाली आहेत. सहा वेळा पंतप्रधान राहिलेल्या रानिल विक्रमसिंघे यांनी जुलै 2022 गोटबाया राजपक्षे यांनी पायउतार झाल्यानंतर हंगामी अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला होता.

अनुरा कुमारा सध्या कोलंबोचे खासदार आहेत. अनुरा यांना AKD म्हणून ओळखले जाते. अनुरा कुमारा दिसानायके जनता विमुक्ति पेरेमुना (जेव्हीपी) या पक्षाचे आहेत. हा नॅशनल पीपल्स पॉवर (NPP) युतीचा भाग आहे. अनुरा कुमारा हे श्रीलंकेत मार्क्सवादी विचारसरणीचे नेते मानले जाते. दिसानायके यांचा जन्म 24 नोव्हेंबर 1968 रोजी झाला. अनुरा कुमाराला चीन समर्थक मानले जातात.  55 वर्षीय अनुरा कुमार दिसानायके हे श्रीलंकेत उत्कट भाषण देणारे नेते म्हणून ओळखले जातात.