दिल्लीत आज हवेची गुणवत्ता पातळी 366 इतकी नोंदवण्यात आली. त्यामुळे दिल्लीच्या हवेत सुधारणा झाली नसल्याचेच समोर आले असून कमिशन फॉर एअर क्लालिटी मॅनेजमेंटने शहरात ग्रेडेड रिस्पॉन्स अॅक्शन प्लॅन-3चे निर्बंध पुन्हा लागू केले आहेत. हे निर्बंध एनसीआर भागातही लागू होतील. त्यानुसार रस्ते बांधकाम तसेच मोठय़ा डागडुजीच्या कामांवर बंदी घालण्यात आली आहे. त्याचबरोबर इयत्ता पाचवीपर्यंतचे वर्ग हायब्रीड पद्धतीने चालवले जाणार आहेत. याअंतर्गत पालकांना त्यांच्या मुलांना घरबसल्या ऑनलाईन शिक्षण देण्याचा किंवा शारीरिक वर्गासाठी शाळेत पाठवण्याचा पर्याय असणार आहे.