परळच्या वाघेश्वरी देवीचा उद्या वार्षिक उत्सव

परळच्या गोलंजी हिल येथील दैवज्ञ ब्राह्मण समाजाच्या जागृत वाघेश्वरी देवीचा वार्षिक जत्रोत्सव येत्या रविवारी 20 एप्रिल रोजी होणार आहे. या वेळी वार्षिक सूक्तशांती, होम हवन होणार असून मुंबई, ठाणे, पुण्यातून देवीचे भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

परळ येथील वाघेश्वरी देवीचा उत्सव दैवज्ञ ब्राह्मण समाजाच्या श्री वाघेश्वरी देवी टेम्पल ट्रस्टच्या माध्यमातून साजरा केला जातो. येत्या रविवारी 20 एप्रिल रोजी देवीचा जत्रोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यंदाचे या जत्रोत्सवाचे 68वे वर्ष आहे. या वर्षी होणाऱ्या वार्षिक सूक्त शांती होम हवनाचे यजमान श्री व सौ. श्रद्धा श्रीनिवास नाईक, शुभांगी सचिन माहीमकर, सलोनी समीर वैद्य व मृणाल मृणांक गृहागरकर हे असणार आहेत. दर्शन सकाळी 8.30पासून सुरू होणार असून महाप्रसाद दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत होणार आहे.

टेम्पल ट्रस्टचे विश्वस्त सुरेंद्रभाऊ शंकरशेट, अध्यक्ष संजय (नाना) वेदक, विश्वस्त नरेंद्र बांदिवडेकर, कार्याध्यक्ष मोहनशेठ म्हाप्रळकर, विश्वस्त खजिनदार देवेंद्र खेडेकर, चिटणीस नरेश वैद्य, विश्वस्त अरुण आडवणकर, चिटणीस सुमन शिर्वटकर, विश्वस्त रेखा नागवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव पार पडणार आहे.