परळच्या स्वामी समर्थ मठाचा वर्धापन दिन

परळच्या सेंट्रल रेल्वे वर्कशॉप येथील स्वामी समर्थ मठाचा 23 वा वर्धापन दिनानिमित्त 21 एप्रिलला अखंड नामस्मरण, होम हवन आणि संध्याकाळी श्रींचा पालखी सोहळा होणार आहे. तसेच अक्षय्य तृतीयेनिमित्त 30 एप्रिलला होमहवन, आयुर्वेदिक चिकित्सा शिबीर, नाना पालकर सेवा सदन येथील रुग्णांना जेवण तसेच अनाथाश्रमात फळ वाटप व संध्याकाळी स्वामिमय भक्ती संगीताचा कार्यक्रम होणार आहे तर 1 मे रोजी ह.भ.प. आचार्य पांडुरंग शास्त्री शितोळे यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम होईल, अशी माहिती श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाचे अध्यक्ष सचिन शेटये यांनी दिली.