गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल अमेरिकेतून ताब्यात

कुख्यात गुंड लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेतून ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मुंबई पोलीस दलातील सूत्रांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्ये प्रकरणात आणि सलमान खान याच्या घराबाहेर गोळीबार केल्याप्रकरणी अनमोल मुंबई पोलिसांना हवा होता.

अनमोल अमेरिकेत असल्याची माहिती मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांनी त्याच्या प्रत्यार्पणासाठी प्रस्ताव पाठवला होता. राष्ट्रीय तपास यंत्रणेने अलिकडेच अनमोल बिष्णोईबद्दल माहिती देणाऱयाला 10 लाख रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा केली होती. एनआयएने अनमोलविरोधात 2022मध्ये दोन प्रकरणांत आरोपपत्र दाखल केले.